• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बीड जिल्ह्यात शनिवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

ByND NEWS INIDIA

May 13, 2021

 

बीड दि.13 ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिनांक 15 मे ते 25 मे या कालावधीत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश आज दुपारी काढले आहेत. दहा दिवसाच्या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना पूर्ण वेळ बंद राहणार आहेत.सदरील आदेश शनिवारी दि.15 मे रोजी रात्री 12 पासून लागू होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे की, दिनांक 15 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपासून ते 25 मे 2021 रोजीचे रात्रीचे 12 वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

१). दिनांक १५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५.०५.२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० चे या दरम्यान केवळ खालील आस्थापना पूर्णवेळ सकराहतील . सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्र , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसीचे उत्पादन व वितरण , सेनिटायझासं , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने . टपाल सेवा इ . उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त विवशी चालू राहणार नाहीत .

२) दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत सुरु राहील ,

३) गैस वितरण दिवसभर सुरु राहील .

४)बैंक / ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .०१.०० वाजेपर्यंत केवळ शासकीय व्यवहार , पेट्रोलपंप व गैस एजन्सी धारकांचे व्यवहार , ची निविष्ठांशी संबंधित व्यवहार , वैद्यकिय कारणास्तव केले जाणारे व्यवहार , सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांचे वेतनाबाबतचे व्यवहार , अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणा – या आस्थापना यांना या वेळेत बैंकेत जाऊन व्यवहार करण्यास मुभा असेल.दरम्यानच्या काळात एटीएम कैशच्या वाहनांना परवानगी असेल . तसेच दुपारी ०१.०० ते ०४.४५ वाजेपर्यंत बँकेचे कर्मचारी यांना केवळ अंतर्गत कामकाजास मुभा असेल , शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील . ( ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल . )

१. लसीकरणा करीता ४५ वर्षावरील ज्या व्यक्तीचा दुसरा डोससाठी मॅसेज आला आहे . त्यांनाच लसीकरणचा डोस घेण्यासाठी जाण्यास मुभा असेल ( लसीकरणासाठी आलेला मेसेज / आरोग्य विभागाचे पा , आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असेल )

७) कृषी व्यवसायाशी संबंधित बि – बियाणे , खते , औषो गांधी जी दुकाने आहेत त्या दुकान मालकास आलेले वि बियाणे , खते , औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरुण घेण्यास मुभा असेल ,

८)नरेगाची कामे सुरु राहतील . या ठिकाणी सामाजिक अंतर , मास्क , सैनिटायझर चा व कोविड १ ९ विषदक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल

९) स्वस्त धान्य दुकानदार यांनी दिनांक १६.०५.२०२१ ते २०,०५ , २०२१ या कालावधीत केवळ गोडाऊन ते स्वस्त धान्य दुकान किंवा गोडाऊन या ठिकाणी माल उतरुण घेणे व दिनांक २१.०५.२०२१ पासून सकाळी ७.३० ते ११.०० मा वेळेतच लाभाध्यांना धान्य वितरण करण्यास मुभा राहील , ( राशनसाठी जाणा – या व्यक्तींच्या सोचत राशनकार्ड , आधार कार्ड असणे आवश्यक आहे . )

१०) जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्णवेळ पूर्णपणे बंद राहतील . दिनांक १५ / ०५ / २०२ ९ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपासून ते २५/०५/२०२१ रोजीचे रात्रीचे १२.०० वाजेपर्यंत या कालावधीत अन्य असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येऊन त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल। सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागाची राहील असे आदेशात म्हटले आहे.