• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा

ByND NEWS INIDIA

May 7, 2021

गेवराई तालुक्यातील देशातील दत्तगुरूंचे भोजन स्थान असलेल्या ग्रामपंचायत पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो परंतु यावर्षी कोविड सारख्या महा भयंकर महामारी मुळे वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला व कार्यकर्त्यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन कार्यक्षम सरपंच समाधान उदरभरे यांनी केले आहे.

पंचाळेश्वर चे कार्यक्षम सरपंच यांनी आतापर्यंत गावासाठी भले मोठे योगदान दिले आहे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम ग्रामपंचायत मार्फत गावासाठी व ग्रुप ग्रामपंचायत मधील तांडा वस्ती वर कामे केली आहेत सरपंच उदरभरे यांनी आतापर्यंत दत्तनगर वस्ती येथे सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले, दत्तनगर वस्ती येथे सिमेंट काँक्रीट रोड, पंचाळेश्वर सर्व गावांमध्ये अंडरग्राउंड नाल्या बांधकाम केल्या, पुजारी गल्लीमध्ये पेवर ब्लॉक बसवण्यात आले, दलित वस्ती येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बोर घेऊन त्या ठिकाणी सोलारपंप बसून 24 तास पाण्याची व्यवस्था केली, ठाकरवाडी येथे 17 लाखाची सार्वजनिक विहीर करून ठाकरवाडी तांड्याचा पाणी प्रश्न मिटवला व तसेच ठाकरवाडी मध्ये एक नवीन शाळा खोलीचे बांधकाम करून अंगणवाडी चा ही कायापालट केला, गावातील शाळेसाठी एलसीडी टीव्ही सीसीटीव्ही कॅमेरे खुर्च्या टेबल शाळेसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले, अंगणवाडी येथे रंगरंगोटी करून अंगणवाडीचा कायापालट केला, दलित बांधवांसाठी समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली व अधिकाअधिक रमाई घरकुल मिळवून दिले, गावातील 100 हून अधिक नागरिकांचे घरकुलच्या ड यादीत नाव नोंदवले आणि गावांमध्ये होत असलेला राशन चा काळाबाजार थांबून वेळोवेळी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन राशन सर्व गावकऱ्यांना मुबलक दरात उपलब्ध करून दिले. गावकऱ्यांच्या नेहमी सुखा-दुखात खंबीरपणे उभे असणारे खंबीर नेतृत्व समाधान उदरभरे यांचा वाढदिवस गावासह पंचक्रोशीत मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा होतो परंतु या कोविड च्या महामारी मुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला गेल्यावर्षी वाढदिवसानिमित्त करोणा सारख्या महाभयंकर महामारी मध्ये मास्क, सॅनीटायझर, गोरगरिबांना किराणा धन्य विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला. असेच त्यांचे आयुष्य समाजकार्य ने भरून राहो आसे आशीर्वाद पंचाळेश्वर मधील पावन भूमीतील महाराजांनी दिले आहेत व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.