• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जनतेला होणारा त्रास थांबवा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ- निळकंठ चाटे

ByDeepak Gitte

May 7, 2021

परळीतील “लसीकरणाच्या ढिसाळपणा” बाबत भाजपा कार्यकर्ते आक्रमक..!

जनतेला होणारा त्रास थांबवा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ- निळकंठ चाटे

प्रतिनिधी- दिपक गित्ते

ND NEWS | दि.०७-परळी शहरात लसीकरण कार्यक्रम प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे कोलमडला असून याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना व वृद्धांना होत आहे ,याच अनुषंगाने भाजपा कार्यकर्त्यांनी आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांची भेट घेऊन लसीकरणाच्या प्रश्नावर चांगलेच फैलावर घेतले व जाब विचारला. शहरातील लसीकरनाचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला असून नियोजनाच्या ढिसाळ पणा मुळे नागरीकांना व वयोवृद्ध लोकांना तासंतास लाईन मध्ये उभे राहून सुद्धा लस मिळत नसल्याने नागरिक परेशान झाले आहेत,शहरात केवळ 3 लसीकरण केंद्रे असल्याने व कर्मचारी अपुरे असल्याने नियोजनात ढिसाळपणा येत असून या प्रसंगी आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी डॉ मोरेंना झालेल्या प्रकारा बद्दल चांगलेच  फैलावर घेतले आणि प्रशासनाने तात्काळ लसीकरण केंद्रे वाढवून चांगले नियोजन लावावे  अन्यथा भारतीय जनाता पार्टी च्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात येईल व याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल अशा सूचना दिल्या या वेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे,नगरसेवक प्रा. पवन मुंडे,अशविन मोगरकर, सचिन गित्ते, नरसिंन सिरसाठ, पवन मोदाणी, आनिश आग्रवाल, राजेद्र ओझा, मोहन जोशी, बाळासाहेब फड,दिलीप नेरकर, विशाल मुंडे, राजेश अघाव, गोविंद चौरे,शाम गित्ते, दिलीप नेरकर, नाना गित्ते, दिपक नागरगोजे, दिपक गित्ते, गडदे तुकाराम चैतन्य मुंडे, मस्के, आदी उपस्थित होते.