• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आईच्या वर्षश्राध्दाच्या खर्चाला फाटा देत संघर्ष धान्य बँकेत केले धान्य जमा; जि.प. शिक्षक सुरेश ठाकरे यांचा आदर्श

ByND NEWS INIDIA

Apr 27, 2021

*📡ND NEWS

:सुशील टकले (गेवराई) *

गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरवाली येथील आदर्श शिक्षक श्री सुरेश ठाकरे सर यांनी आपल्या आईच्या वर्ष श्रद्धा दिवशी इतर खर्चाला फाटा देत संघर्ष धान्य बँक गेवराई येथे अनाथ वंचितांसाठी 70 किलो धान्य जमा केले. एक वर्षापूर्वी सुरेश ठाकरे सर यांच्या आई कै. कलाबाई ठाकरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते.त्यांचा आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता. श्री ठाकरे सर यांनी आपल्या आईच्या वर्ष श्रद्धा निमित्त पूजापाठ,होमहवन इत्यादी खर्चाला फाटा देत अनाथ वंचितासाठी दान करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी संघर्ष धान्य बँक गेवराईचे श्री शिवाजी झेंडेकर सर यांच्याकडे संघर्ष धान्य बँकेत 70 किलो धान्य अनाथ वंचित गोरगरीब मुलांसाठी जमा केले. श्री सुरेश ठाकरे सर यांच्या आई नेहमी गोरगरिबांना मदत करत असत. मृत्यूनंतर आईच्या वचनानुसार ठाकरे सर नेहमीच गोर गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असतात.
वर्ष श्रद्धा दिवशी पूजाविधी, होमहवन इत्यादी गोष्टी करून मृतात्म्याला कुठल्याही प्रकारची शांती मिळत नसते याउलट हाच खर्च जर आपण गोरगरिबांची भूक भागवण्यासाठी केला तर कुठेतरी त्यांचे आशीर्वाद आपल्या कामी येत असतात. हीच मयत व्यक्तीला खरी श्रद्धांजली ठरते. खरंतर कुठलाही व्यक्ती मयत झाल्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाची आवश्यकताच नसते. परंतु समाजातील अनिष्ट रूढी परंपरा ते करण्यास भाग पाडतात. एकदा व्यक्ती मयत झाला म्हणजे त्याचे कुठलेही अस्तित्व या जगात उरत नाही. माणूस जिवंत असताना त्याची सेवा करणे व मयत झाल्यानंतर त्यांच्या आदर्शावर चालणे हि सगळ्यात मोठी त्या व्यक्तीसाठी आदरांजली असते.श्री ठाकरे सर यांनी केलेले कार्य हे आदर्श व इतरांसाठी प्रेरणादायी आहे. याप्रसंगी श्री सुरेश ठाकरे, श्री बद्रीनाथ करपे, श्री शिवाजी झेंडेकर, श्री.रविराज ठाकरे, श्री शुभम ठाकरे उपस्थित होते.