• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

५ जून रोजी परळी नगरपालिका समोर आमरण उपोषण : प्रशांत जगतकर राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने अनिश्चित कालावधीसाठी साखळी उपोषण

परळी नगरपालिकेसमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने पाच जून रोजी अनिश्चित कालावधीसाठी साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता.महागाई भत्याची फरकाची थकीत रक्कम व डी.सी.पी.एस खाते क्रमांक देण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण व थकीत बिल देण्यात लेखा विभाग प्रमुख यांच्यावर काय कारवाई करण्यात आली त्याची लेखी माहिती देण्यात यावी यावे. यासाठी कर्मचारी संघटनेने दिनांक ५/१२/२०२२ .१४/१२/२०२२.२३/१२/२०२२.६/१/२०२३.१६/२/२०२३. बीड २३/३/२०२३ व १२/४/२०२३ असे अनेक वेळा लेखी निवेदन दिले असता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाच हजार रुपये दिलेले अग्रीम कपात करण्यात येऊ नये तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला डबल सेवेत न घेता ज्यांची पात्रता आहे अशांना नियुक्ती देण्यात यावी. या व इतर मागण्यासाठी माननीय मुख्याधिकारी साहेब यांना लेखी निवेदन दिले असून त्याची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी अन्यथा आम्ही संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे परळी नगरपरिषद शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर यांनी दिली आहे.