• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावनेर येथे इ क्लास जमीनीवर पाच फूट नाली खोदल्याने मुक्या जनावरांचा जिव धोक्यात

राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावनेर येथे इ क्लास जमीनीवर पाच फूट नाली खोदल्याने मुक्या जनावरांचा जिव धोक्यात

चेतन वर्मा राळेगाव प्रतिनीधी:-

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत सावनेर च्या गट नंबर दोनशे पाच या जमीनीवर सदर इसमाने जेसीबीच्या सहाय्याने अंदाजे दोन एक्कर जमीन ताब्यात घेतली तसेच ग्रामपंचायत ने त्या शेतात व्रृक्षलागवड सुद्धा केली होती पण अतिक्रमण धारकाने कोणताही विचार न करता त्या व्रुक्षलागवडीवर जेसीबी फिरवली तसेच शेतातील रस्त्यावर अंदाजे पाच फूट नाली खोदकाम करून ठेवले आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खोदलेल्या पाच फूट नाली मध्ये मुके जनावर किंवा शेतकरी पडला तर मोठे नुकसान होण्याची भीती नाकारता येत नाही याला जबाबदार कोन असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. सबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब या जमीनीवर केलेले अतिक्रमण मोकळे करून द्यावे अशी मागणी गावकरी करत आहे.