• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मौजे कन्हेरवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न

ByDeepak Gitte

Apr 16, 2023
  • ◼️मौजे कन्हेरवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न

◼️ गावातील सर्व पुरुष व माता-भगिनींनी ग्राहक सेवा केंद्राचा लाभ घ्यावा: माणिकभाऊ फड

बीड | दिपक गित्ते

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी परळी तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि मोठी लोकसंख्या असलेल्या कन्हेरवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ग्राहक सेवा केंद्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकभाऊ फड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुने म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. जि.प.सदस्य मधुकर अघाव सर, पोलीस उप निरीक्षक झाबंरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते शंकर कापसे सर , कपिल गाड़ेकर , अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुका समन्वयक धनंजयजी अरबूने ,डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका सचिव पत्रकार दीपकजी गित्ते, सुरेशनाना फड , संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सूर्यकांतजी मुंडे, महादेव रोड़े डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष नितिन ढाकणे, डिजिटल मीडिया परिषदेचे शहर अध्यक्ष पत्रकार अभिमन्यु फड़, कन्हेरवाडी चे ग्रामपंचायत सदस्य भगवान दादा कन्हेरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य विकास दादा मुंडे, वैभव रोडे, आकाश रोडे इत्यादि उपस्थित होते.