• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बेरोजगाराच्या दारात मरण,14 मार्च 2023 च्या परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी ■खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय आक्रमक परळी / प्रतिनिधी डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने सोमवार दि 17 रोजी सकाळी 11 वा परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगाराच्या दारात मरण घेऊन आलेल्या 14 मार्च 2023 चे परिपत्रक रद्द करा, म्हणून सदरील परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी करण्यात आली .नोकर भरती व खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय संघटना आक्रमक झाली असून परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीने 14 मार्चच्या परिपत्रकाचे होळी करून सरकारचा निषेध करण्यात सरकारी नोकरीचे खाजगीकरण,कंत्राटीकरण बंद करा. सर्व विभागातील रिक्त जागा त्वरित भरा यासह बेरोजगारांच्या विविध मागण्यांचे निवेदनही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व विभागातील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नौकरभरती करा. खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा. या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी, युवकांच्या, बेरोजगारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेकदा निवेदने देऊन आंदोलने केली आहेत.या निदर्शने मोर्च्याला शुभेच्छापर पाठींबा देताना किसान सभेचे बीड जिल्हाधक्ष कॉ. अजय बुरांडे हे म्हणाले की आता शेतकऱ्यांची मुले मूलभूत प्रश्नांना ओळखू लागली आहेत. जात-धर्म,मंदिर-मज्जिद या मुद्द्यांना सोडून ते आता रोजगार, आरोग्य,शिक्षण यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनावेळी शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, तालुक्यातील विद्यार्थी, बेरोजगार युवक उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर डी.वाय.एफ.आयचे जिल्हा सचिव विशाल देशमुख ,देविदास जाधव, प्रशांत म्हस्के उपस्थित होते.हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनोज देशमुख,विजय घुगे,राम गडदे,मुंजाहरी नवगरे,मनोज स्वामी, मदन वाघमारे,प्रशांत कोकाटे, शेख इस्माईल, दामोदर घुगे, अरुण गित्ते, सोळंके रोहित, गणेश कराड, बालाजी गुट्टे, शेप बाळासाहेब, नवगरे संजय, रमेश बुरांडे, रणखांब निसर्ग, शिंदे प्रवीण, रोहन उबाळे, श्रीनिवास उबाळे, राहुल काशीद,सिद्राम सोळंके आदीं सह अनेक युवकांनी प्रयत्न केले. या होत्या प्रमुख मागण्या 1)सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण त्वरित थांबवा. 2)सरकारी नोकरीतील सर्व पदभरती एम पी एस सी मार्फत करा. 3)सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 5000 रुपये बेरोजगार भत्ता तत्काळ सुरू करा. 4)34 हजार शिक्षक भरती तत्काळ चालू करा. 5)सर्व भरती परीक्षांसाठी घेण्यात येणारे परीक्षा शुल्क 100 रुपयांपेक्षा जास्त नसावे. 6)सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण बंद करा. 7)तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्या. 8)सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा. 9)नोकर भरती केंद्रामध्ये पारदर्शकता आणून त्याची पुनर्रचना करून आधुनिकीकरण करा. 10)बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार द्या. 11) 27 शासकीय महाविद्यालयातील 5056 पदे बाह्य स्त्रोतामार्फत भरण्यासाठीची काढलेली निविदा तात्काळ रद्द करा.

बेरोजगाराच्या दारात मरण,14 मार्च 2023 च्या परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी
■खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय आक्रमक

ND NEWS I परळी प्रतिनिधी

डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने सोमवार दि 17 रोजी सकाळी 11 वा परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगाराच्या दारात मरण घेऊन आलेल्या 14 मार्च 2023 चे परिपत्रक रद्द करा, म्हणून सदरील परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी करण्यात आली .नोकर भरती व खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय संघटना आक्रमक झाली असून परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीने 14 मार्चच्या परिपत्रकाचे होळी करून सरकारचा निषेध करण्यात सरकारी नोकरीचे खाजगीकरण,कंत्राटीकरण बंद करा. सर्व विभागातील रिक्त जागा त्वरित भरा यासह बेरोजगारांच्या विविध मागण्यांचे निवेदनही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व विभागातील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नौकरभरती करा. खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा. या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी, युवकांच्या, बेरोजगारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेकदा निवेदने देऊन आंदोलने केली आहेत.या निदर्शने मोर्च्याला शुभेच्छापर पाठींबा देताना किसान सभेचे बीड जिल्हाधक्ष कॉ. अजय बुरांडे हे म्हणाले की आता शेतकऱ्यांची मुले मूलभूत प्रश्नांना ओळखू लागली आहेत. जात-धर्म,मंदिर-मज्जिद या मुद्द्यांना सोडून ते आता रोजगार, आरोग्य,शिक्षण यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.

या आंदोलनावेळी शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, तालुक्यातील विद्यार्थी, बेरोजगार युवक उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर डी.वाय.एफ.आयचे जिल्हा सचिव विशाल देशमुख ,देविदास जाधव, प्रशांत म्हस्के उपस्थित होते.हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनोज देशमुख,विजय घुगे,राम गडदे,मुंजाहरी नवगरे,मनोज स्वामी, मदन वाघमारे,प्रशांत कोकाटे, शेख इस्माईल, दामोदर घुगे, अरुण गित्ते, सोळंके रोहित, गणेश कराड, बालाजी गुट्टे, शेप बाळासाहेब, नवगरे संजय, रमेश बुरांडे, रणखांब निसर्ग, शिंदे प्रवीण, रोहन उबाळे, श्रीनिवास उबाळे, राहुल काशीद,सिद्राम सोळंके आदीं सह अनेक युवकांनी प्रयत्न केले.

या होत्या प्रमुख मागण्या
1)सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण त्वरित थांबवा.
2)सरकारी नोकरीतील सर्व पदभरती एम पी एस सी मार्फत करा.
3)सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 5000 रुपये बेरोजगार भत्ता तत्काळ सुरू करा.
4)34 हजार शिक्षक भरती तत्काळ चालू करा.
5)सर्व भरती परीक्षांसाठी घेण्यात येणारे परीक्षा शुल्क 100 रुपयांपेक्षा जास्त नसावे.
6)सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण बंद करा.
7)तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्या.
8)सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा.
9)नोकर भरती केंद्रामध्ये पारदर्शकता आणून त्याची पुनर्रचना करून आधुनिकीकरण करा.
10)बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार द्या.
11) 27 शासकीय महाविद्यालयातील 5056 पदे बाह्य स्त्रोतामार्फत भरण्यासाठीची काढलेली निविदा तात्काळ रद्द करा.