• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*■गावा गावात होळी* *शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी-घराघरातून पूरण पोळी*

ByDeepak Gitte

Mar 7, 2023

*■गावा गावात होळी*
*शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी-घराघरातून पूरण पोळी*

परळी / प्रतिनिधी

शेतकरी कीर्तन महोत्सवाने गावा गावातील सामाजिक ऐक्याची भावना बळकट होत आहे.सोमवार रोजी सर्वत्र होळीच्या सणानिमित्ताने घरा घरात पोळी होते. शेतकरी कीर्तन महोत्सवातील सोमवार, 6 मार्च जेवणाची जबाबदारी कावळ्याचीवाडी व बोधेगावच्या शेतक-यांनी घेतली होती. खरं तर शेतकरी कीर्तन महोत्सवात भाकरी पाठविण्याचा संकल्प होता. पण रात्री बोधेगावच्या माय-माऊल्यांनी विचार केला. माझ्या घरात पोळी होत असेल घरातल्या दहा पुरण पोळ्या करण्या आधी कीर्तन महोत्सवासाठी माझ्या दोन पोळ्या गेल्या पाहिजेत. कावळ्याचीवाडी, बोधेगाच्या शेतकरी मातामाऊल्यांनी पाठविलेल्या भाकरी पुरण पोळ्यांनी शेतकरी कीर्तन महोत्सवातील वारकरी तृप्त झाले.

जातीधर्माच्या पलीकडे जाऊन जश्या घराघरांतून भाकरी-पोळ्या येतात, त्याच भावनेतून सर्व भेद विसरून ग्रहण केल्या जातात. हे खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराजांच्या आचारविचाराचे श्रवण आहे.आणि त्यांचे हे व्यापक आचारविचार या ठिकाणी मानसं जगत आहेत; त्या प्रमाणे वागत आहेत. म्हणून हा शेतकरी कीर्तन महोत्सव एका क्रांतीची पायवाट होत आहे. अशी भावना लोकसहभाग पाहून या कीर्तन महोत्सवाचे समन्वयक ॲड. अजय बुरांडे यांनी व्यक्त केल्या.