• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उपजिल्हा रुग्णालय केज येथे स्वच्छ मुख अभियान संपन्न

ByND NEWS INIDIA

Mar 3, 2023

उपजिल्हा रुग्णालय केज येथे स्वच्छ मुख अभियान संपन्न

 

केज प्रतिनिधी :

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राउत यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३ मार्च शुक्रवार रोजी स्वच्छ मुख अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपस्थित सर्व रुग्णांना तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांना दंत व मौखिक आरोग्याचे महत्त्व, मौखिक आरोग्याची घ्यावयाची काळजी तसेच ब्रश करण्याची आदर्श पद्धती ब्रश आणि मॉडेल घेऊन सविस्तरपणे डॉ. रमण दळवी यांनी समजावून सांगितली. आयोजनासाठी श्रीमती सीतागिरी समुपदेशक यांचे विशेष सहकार्य होते. कार्यक्रमास प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री बहिरट साहेब, श्री देवकते, सौ शोभा साकसमुद्रे,क्ष किरण तंत्रज्ञ श्री जाधव, औषध निर्माता श्री टेकाळे तसेच सेक्युरिटी गार्ड इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्व रुग्णांना मौखिक आरोग्याची माहिती असणारे पॅम्प्लेटचे देखील वितरण करण्यात आले.