• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ऑक्सिजन बंद झाल्याने बीड मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू

ByDeepak Gitte

Apr 24, 2021

ऑक्सिजन बंद झाल्याने बीड मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

जिल्हा रुग्णालयातील प्रकारची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा- पंकजाताई मुंडे यांची मागणी

ND NEWS | दि २४- अचानक ऑक्सिजन बंद झाल्याने दोन रुग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे,या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
आज पहाटे जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक सात मध्ये पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण दगावण्याची घटना घडली. अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून रुग्णालयाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.