• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*गंगे पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करुन बुडवलेला महसूल वसूल करा- उत्तमराव माने

ByDeepak Gitte

Apr 15, 2021

*गंगे पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करुन बुडवलेला महसूल वसूल करा- उत्तमराव माने

उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी , समोर उत्तमराव माने यांचे आमरण उपोषण

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

ND NEWS | दि-१५.  गंगे पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करुन बुडवलेला महसूल वसूल करा, गंगा पात्रातील उपसलेल्या वाळूचे पंचनामे तात्काळ करा, वाळू माफियांना सहकार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून महसूल त्यांच्या पगारातून वसूल करा या व इतर मागण्यासाठी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तम दादा माने, पंडितराव मुठाळ,विष्णू रोडगे,रमेश सहजराव हे उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी समोर आमरण उपोषणास बसले आहेत.
गोदावरी नदीपात्रातून डिग्रस,पोहनेर,तेलसमुख,बोरखेड या गावातून सर्रासपणे गेल्या ०२ महिन्यापासून वाळूमाफियांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैधरित्या वाळूउपसा चालु आहे,यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे.संबंधित गावच्या लोकप्रतिनिधींनी आत्तापर्यंत सर्व खात्याचे संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून व मोबाईलद्वारे अनेकवेळा कल्पना दिली,काही लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरूपात अर्ज केले आहेत जनतेच्या रेट्यामुळे तात्पुरता वाळू उपसा स्थगित केला आहे.
वाळू उपसा करणारे माफिया यांनी संबंधित गावांमध्ये दहशत निर्माण केली आहे.जर कोणी आडवे आले तर त्यांना गोळ्या घालण्याच्या किंवा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.कोविड -१९ या आजाराने थैमान घातलेले असताना सुद्धा वाळू माफियांनी वाळू उपशाबाबत थैमान घातलेले आहे.भविष्यात गंगेचे पात्र वाळूच्या ऐवजी फक्त खडकाळ राहील अशी अवस्था होईल.दररोज १०० ते १५० वाहने सर्रास चालू आहेत यामुळे शासनाचा महसूल बुडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन महिन्यापासून अवैधरित्या उपसलेल्या वाळूचा महसूल संबंधितांकडून वसूल करून संबंधित वाळू माफिया व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून महसूल वसूल करा आशी मागणी केली आहे .