• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अट्टल महाविद्यालयाच्या मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र संयोजकपदी डॉ. अमोल शिरसाट

ByND NEWS INIDIA

Sep 13, 2021

 

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी

 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या र. भ. अट्टल महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्र संयोजकपदी रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, उपाध्यक्ष तथा महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख अमरसिंह पंडित, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर रजनी शिखरे, उपप्राचार्य प्रोफेसर विजय सांगळे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, कार्यालय अधीक्षक भागवत गवंडी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.