• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराजांची विचार आचरणात आणावेत -अभयकुमार ठक्कर

 

पवनराजे बँकेत शिवजयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाच्या हितासाठी लढले. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जंयतीनिमित्त आज आज बुधवार दिनांक 31 मार्च रोजी पवनराजे बँकेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

आज बुधवार दिनांक 31 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कंडक्टर कॉलनी रोड वर नव्यानेच सुरू झालेल्या पवन राजे मल्टीपर्पज अर्बन बँकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा अतुल दुबे सर, ज्येष्ठ नेते सतीश जगताप आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे यथोचित स्वागत पवनराजे बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील सचिव गोविंद भरबडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

यावेळी बोलताना श्री अभय कुमार ठक्कर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हते. त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातिधर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करायचे, त्यामुळे आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार आचरणात आणने गरजेचे असल्याचे श्री ठक्कर म्हणाले.

कार्यक्रमास पवनराजे बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे ,सचिव गोविंद भरबडे यांच्यासह बँकेतील सर्व संचालकश्री.प्रल्हाद काळे ,श्री.रामेश्वर भोसले ,मयूर जिरगे,शत्रुघन भरबडे, गोविंद मुंडे,शेख खाजा ,सौ.वैजंतीमाला घवले,सौ.सोनाली वैराळे,ज्ञानेश्वर सातपुते तसेच कार्यालयीन कर्मचारी व खातेदार उपस्थित होते.