• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आरोग्य सेवेसह शैक्षणिक सेवा देणारे कर्तुत्ववान डॉ. बी आर मोटे

ByND NEWS INIDIA

Sep 5, 2021

 

 

गेवराई तालुक्यातील गंगावाडी सारख्या छोट्याशा खेड्यात जन्म झालेल्या डॉ बी आर मोटे यांनी लहानपणीच ठरवले होते की गेवराई तालुक्यासाठी काहीतरी करायचे तालुक्याची सेवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करायची हेच मनात ठेवून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर एम बी बी एस करायच ठरवलं व ते पूर्ण केले. एमबीबीएस झाल्यावर अनेक ठिकाणी बोलावलं जाई की तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये या परंतु त्यांनी सरकारी दवाखान्यांमध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात व सरकारी सेवा करत असताना अनेक पद भूषवले परंतु तालुक्याच्या लोकांसाठीची तळमळ स्वस्त बसू देत नव्हती. त्यांनी गेवराई शहरात लोकांना आधार देण्यासाठी आधार हॉस्पिटल ची निर्मिती केली. आज आधार हॉस्पिटल म्हंटलं की तालुक्यातील अतिदक्षता विभाग म्हणला तर फक्त आधार हॉस्पिटलच, रुग्णांना धीर देणे पैसे असो किंवा नसो उपचारांमध्ये काही कमतरता कधी केली नाही. कोरोणा सारख्या महाभयंकर महामारी मध्ये सुद्धा ते शांत बसले नाही शासकीय परवानग्या पूर्ण करत त्यांनी गेवराई तालुक्यात पहिले खाजगी कोविड सेंटर चालू केले. व्हेंटिलेटर सारख्या सुविधा ज्या सरकारी सेवेमध्ये मिळत नव्हत्या त्या तिथे चालू केल्या, आधार हॉस्पिटल एका उंचीवर असून फक्त आधार हॉस्पिटल चालू ठेवून चालले असते पण काहीतरी वेगळे करायची धडपड स्वस्त बसू देत नाही स्वतः खेड्यातील असल्यामुळे खेड्यातील शिक्षण काय असते हे त्यांनी जाणले होते आणि ज्याला जाणीव असते तोच काहीतरी करून दाखवतो. खेड्यातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे या हेतूने द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल ची सुरुवात त्यांनी गेवराई शहरात केली थोड्याच दिवसात शाळा ही नावारूपाला आणली शाळेमध्ये शैक्षणिक वातावरणा सह संगीत कला खेळ या गोष्टीकडे लक्ष दिले यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी कमी कालावधीत अनेक पारितोषिके मिळवून दिले. शाळेची इमारत तालुक्यातील शाळे मधील एक आगळीवेगळी इमारत बांधून गेवराई तालुक्यातील सांस्कृतिक वारस्यात भर घातली. या सर्व गोष्टी करत असताना घरच्यांचाही तितकाच पाठिंबा असावा लागतो आणि तो त्यांना मिळत राहिला. जसे एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तसे त्यांच्या पत्नी डॉ वर्षा मोटे यांनी वैद्यकीय सेवेसह शैक्षणिक सेवेतही तितकीच मदत केली. एवढे मोठे कार्य करत असताना आणायचे कोठून, करायचे कसे लोक प्रतिसाद देतील का हे प्रश्न असतात, त्या सर्व प्रश्नावर मात करून त्यांनी करून दाखवले त्यामुळे त्यांच्या या हीमत्तीची दाद सर्वच देतात. शाळा उभारत असताना करोणा सारखी महामारी आली परंतु तेथेही न डगमगता शाळेसोबत खंबीरपणे उभे राहून ऑनलाईन पद्धतीने शाळा चालवली. हे सर्व करणं खडतर जरी वाटलं तरी डॉक्टर साहेबांनी मात्र ते कधीही स्वतः खडतर समजलेलं नाही त्यांनी धैर्याने तोंड दिले परंतु स्वप्न पाहण्यापेक्षा ते सिद्ध करून दाखवणे हे महत्त्वाचं असतं सोयी-सुविधांचा अभाव असताना परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा धाडस कसं कामाला येतं आणि धाडसी मानसे कसे यशस्वी होतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बी आर मोटे. इथे एक कवी चे उदाहरण जुळते की एका कवीला प्रश्न विचारला होता की कविता करणे म्हणजे नेमके काय किंवा कविता काय असते, त्यावेळेस त्या कवीने छान आस उत्तर दिलं होतं की कविता करणे म्हणजे आकाशात विविध रुपात वीज चमकत असते ती वीज पकडण्याचा प्रयत्न म्हणजे कविता. त्याच्यामध्ये स्वतः होरपळून त्या विजेला धरण्याची क्षमता असते तेच लोक या ठिकाणी धाडसाचं काम करतात आणि हेच धाडसी काम डॉक्टर बी आर मोटे यांनी करून आज वैद्यकीय व शैक्षणिक सेवेत आपले व आपल्या संस्थेचे नाव उंचावर नेले आहे. शिक्षक दिनी जन्मलेला ध्येयवेडा वैद्यकीय सेवा बरोबर शिक्षण क्षेत्रात आपले नाव मोठे करतो आणि शिक्षकांना व्यासपीठ उभे करून देतो हेच खरे शिक्षक दिनी जन्म झाल्याचे सार्थक म्हणावे लागेल. डॉक्टर बी आर मोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

लेखक

सुशिल टकले

पत्रकार गेवराई

9960810244