• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कै.ल.दे.महिला महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण शिबीर संपन्न परळी , दि. १८ / ०४ / २०२३ (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘ प्लेसमेंट सेल ‘च्या अंतर्गत व ‘परम स्कीलच्या ‘ विद्यमानाने आज विद्यार्थिनीसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा. संजयजी देशमुख सचिव मा. रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष मा .प्रा. प्रसाद देशमुख ,प्राचार्य डॉ.एल.एस. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात परम स्किलच्या वतीने सन्माननीय परमेश्वर कुरे यांनी “आपण चांगली कौशल्य आत्मसात केली तर निश्चितच जीवनात आनंदी जीवन जगू शकतो . ” असे उद्गार मार्गदर्शन करताना काढले.रोजगार मिळविण्यासाठी लागणारी कौशल्य व जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्य या अनुषंगाने सखोल व उपयोगी असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेलच्या प्रमुख प्रा.डॉ.कल्याणकर राजश्री प्रा.डॉ.वर्षा मुंडे ,प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड , प्रा. डॉ .रंजना शहाणे , प्रा शरद रोडे ,प्रा. अशोक पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनीबरोबरच परळी पंचक्रोशीतील अन्य विद्यार्थीही उपस्थित होते.

कै.ल.दे.महिला महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण शिबीर संपन्न

ND NEWS | परळी , दि. १८ / ०४ / २०२३ (प्रतिनिधी )

येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘ प्लेसमेंट सेल ‘च्या अंतर्गत व ‘परम स्कीलच्या ‘ विद्यमानाने आज विद्यार्थिनीसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा. संजयजी देशमुख सचिव मा. रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष मा .प्रा. प्रसाद देशमुख ,प्राचार्य डॉ.एल.एस. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात परम स्किलच्या वतीने सन्माननीय परमेश्वर कुरे यांनी “आपण चांगली कौशल्य आत्मसात केली तर निश्चितच जीवनात आनंदी जीवन जगू शकतो . ” असे उद्गार मार्गदर्शन करताना काढले.रोजगार मिळविण्यासाठी लागणारी कौशल्य व जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्य या अनुषंगाने सखोल व उपयोगी असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेलच्या प्रमुख प्रा.डॉ.कल्याणकर राजश्री प्रा.डॉ.वर्षा मुंडे ,प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड , प्रा. डॉ .रंजना शहाणे , प्रा शरद रोडे ,प्रा. अशोक पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनीबरोबरच परळी पंचक्रोशीतील अन्य विद्यार्थीही उपस्थित होते.