• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

घार उडे आकाशी , चित्त तीचे पिलापाशी | या उक्ती प्रमाणेच कार्य करणारे ढाकणे बंधू !

ByDeepak Gitte

Mar 15, 2023
  • ◼️आस्वलांबा गावच्या विकासासाठी सरसावले युवा उद्योजक; स्वखर्चातून श्रीकृष्ण व गोविंद पांडूरंग ढाकणे या दोन बंधूनी राबविले अनेक समाजउपयोगी उपक्रम

◼️घार उडे आकाशी , चित्त तीचे पिलापाशी |
या उक्ती प्रमाणेच कार्य करणारे ढाकणे बंधू

◼️परळी प्रतिनिधी: दिपक गित्ते

ज्यांना स्वतःच्या हाताला बसलेल्या चटक्यांची जाण असते. त्यांनाच समाजाला बसलेल्या चटक्याचे भाण असते. गावाच्या भल्यासाठी व समाजाच्या हितासाठी काम करणारी माणसं खूपच दुर्मिळ असतात. परंतु परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील युवा उद्योजक श्रीकृष्ण व गोविंद ढाकणे हे दोघे बंधू गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चातून अनेक उपक्रम राबवत आहेत याचा फायदा अस्वलंबा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात होत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे युवा उद्योजक ढाकणे बंधू यांनी एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.

माणसाने कितीही उत्तुंग अशी भरारी घेतली तरी आपण जिथे जन्मलो त्या मातीचे ऋण कधीही विसरू नये याची सतत जाणीव ठेवून अस्वलअंबा गावातील श्रीकृष्ण व गोविंद पांडूरंग ढाकणे सदैव समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत. यात अस्वलअंबा गावातील प्रत्येक कन्येच्या विवाहास 11 हजार रूपये कै. पांडूरंगजी ढाकणे यांच्या स्मरणार्थ देण्याचा संकल्प केला असुन दि.13 मार्च रोजी चि.सौ.कां. कविता सुभाष काजगुंडे यांच्या विवाहास 11 हजार रू मातोश्री कुशावर्ती पांडूरंग ढाकणे, गोविंद पांडूरंग ढाकणे व ग्रामंचायत सदस्य अंजली दत्तात्रय ढाकणे यांच्या हस्ते देवून आपल्या गावच्या कन्येच्या विवाहास हातभार लावला आहे. प्रत्येक गावामध्ये श्रीकृष्ण व गोविंद पांडूरंग ढाकणे यांच्या सारखे पूत्र निर्माण झाले तर गावाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही. स्वखर्चातून विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बांधकाम असेल गावातील लहान थोरांना बसण्यासाठी गावात सुसज्ज बैठक व्यवस्था, गावातील सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यासाठी स्वतंत्र जागा त्याचबरोबर गावात जवळपास 15 लाख खर्चून भव्य असे शेड त्यांनी गावासाठी उभा केले आहे. असे एक ना अनेक समाजोपयोगी आणि गावाच्या हिताचे कामे त्याने कुठल्याही स्वार्थीविना मोठ्या अंतकरणाने करून दाखवली आहेत. घार उडे आकाशी, चित्त तीचे पिलापाशी या उक्ती प्रमाणेच परळी तालुक्यातील आस्वलांबा येथील युवा उद्योजक श्रीकृष्ण व गोविंद ढाकणे हे बंधू करीत आहेत. ढाकणे बंधू यांनी गावच्या विकासासाठी आगळावेगळा आदर्श पायंडाच निर्माण केला आहे.

पूर्वीची कुठलीच धनदांडगी पार्श्वभूमी नसताना स्वकर्तुत्वाने निर्माण केलेले यश आणि त्यावरती कुठल्याच प्रकारचा गर्व न करता उलट समाज हिताची कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहेत. आणि अशीच पुढे होत राहतील असा विश्वास गावकऱ्यांच्या वतीने केला जात आहे.