• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केळगाव बेलगाव येथील भ्रष्टाचार प्रकरणी आझाद मैदानावरील आमरण उपोषण १५ व्या दिवशीही सुरूच,

ByND NEWS INIDIA

Mar 15, 2023

केळगाव बेलगाव येथील भ्रष्टाचार प्रकरणी आझाद मैदानावरील आमरण उपोषण १५ व्या दिवशीही सुरूच,

अहवाल सादर परंतु कारवाई कधी.

 

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्यातील केळगाव बेळगाव येथे मंजूर झालेल्या १२५ विहिरी व १२ रस्ते यांची कामे न करताच निधी लाटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेलगाव येथील समाजसेवक प्रताप दातार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना निवेदन देऊन दिनांक २८ फेब्रुवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत.

आज दिनांक १४ मार्च मंगळवार रोजी या उपोषणाचा १५ वा. दिवस असून उपोषण कर्त्याची प्रकृती चांगलीच खालावली आहे. उपोषण स्थळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार भीमराव धोंडे,माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यांनी उपोषण स्थळी भेटी दिल्या आहेत.

भ्रष्टाचार प्रकरणी १७ सदस्सीय समिती नेमण्यात आली होती या समितीने अहवाल सादर केला असून आजूनही भ्रष्टाचार करणाऱ्यांवर व भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी कारवाई केलेली नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर

निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असे उपोषण करते प्रताप दातार यांनी म्हटले आहे.

 

चौकट : भ्रष्टाचाऱ्याकडून व्हाट्सअप स्टेटसद्वारे अधिकाऱ्यांना नोकरी घालवण्याची धमकी देण्यात आली आहे. स्टेटस द्वारे देण्यात आलेली धमकी भ्रष्टाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या १७ सदस्सीय समिती मधीलअधिकाऱ्यांना आहे का केज पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांना आहे हे समजू शकले नाही.