• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासाठी अर्थसंकल्पात तरतूद; बोलण्यावर नाही तर कृतीवर भर देणारा शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने*

ByDeepak Gitte

Mar 9, 2023

*प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासाठी अर्थसंकल्पात तरतूद; बोलण्यावर नाही तर कृतीवर भर देणारा शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने*

*परळीत पेढे वाटून,फटाके फोडून शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा*

*परळी,(प्रतिनिधी):-* केवळ बोलण्यावर नाही तर कृतीवर भर देणारा अर्थसंकल्प शिंदे फडणवीस सरकारने सादर केला आहे. या अर्थसंकल्पात निराधारांचे मानधन ५०० रुपये वाढ करण्यात आली असून परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ आराखड्यास ही भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सर्वच घटकांना भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी म्हटले आहे.आज अर्थसंकल्प सादर होताच परळी शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणी लक्ष्मीबाई टावर येथे फटाके फोडून, पेढे वाटून शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचे फटाके फोडून, पेठे वाटून स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे शहर प्रमुख वैजनाथ माने,उपशहर प्रमुख अॅङ संजय डिगोळे, बाळासाहेब खोसे, विठ्ठल गायकवाड, सचिन सोनवणे, परमेश्वर बनसोडे, सुरज काटुळे, नारायण पांचाळ, दिनेश भोसले, राम खेत्रे, संतोष आमले, अरूण माने आधी सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पा सादर केला. या अर्थसंकल्पा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग/86,300 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून नागपूर-गोवा महामार्ग माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार आहेत. तर महिलांना सक्षमीकरणास चालना देण्यासाठी मासिक २५ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापूर्वी ही मर्यादा मासिक १० हजार रुपये होती.या अर्थसंकल्पाचा फटाके फोडून शिवसेनेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.