• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व दिलासा सामाजिक संस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

 

श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व दिलासा सामाजिक संस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

◼️हनुमंत गव्हाणे :ND NEWS | केज

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील ग्रामीण भागात उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण देणारी संस्था श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन चे संचालक अनिल गलांडे व दिलासा सामाजिक संस्थेच्या ज्योती सांबरे यांनी ग्रामीण भागातील कृतृत्ववान महिलांचा सन्मान व्हावा म्हणून बुधवारी सायंकाळी येथील संत नामदेव महाराज सभागृहात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली येथील श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन व दिलासा सामाजिक संस्था केज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गावातील कृतृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने ह.भ.प. शारदाताई महाराज यांनी वारकरी संप्रदायात व अध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल व आशाबाई हरिभाऊ यादव यांनी महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून काम केले म्हणून तर डॉ. प्रतिक्षा महादेव काळे या विद्यार्थीनीने एम.बी. बी. एस पदवी घेतली म्हणून तर सुलभा ज्ञानेश्वर लिमन यांनी उमेद या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे म्हणून व कु. गीता सुनील मेहरकर या आदर्श विद्यार्थीनी चा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तर येथील ग्रामपंचायत कर्मचारी विश्वास बाबु माळी व युवराज कसबे यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल दैनिक तरुण भारत च्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. मनिषाताई कुपकर या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून केज पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी सौ. सविताताई शेप मॅडम, सरपंच सौ. रोहीणी सुनील देशमुख, भाजपाचे जेष्ठ नेते सुनील आबा गलांडे, माजी सरपंच सुनील बापू देशमुख हे होते.
यावेळी बोलताना शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनिषाताई कुपकर यांनी सांगितले की महिलांचा सन्मान केला पाहिजे, व याची सुरुवात घरातूनच केली पाहिजे, समाजातील विधवा महिलाविषयीच्या अनिष्ट रुढी परंपरा बंद झाल्या पाहिजेत. तर सहाय्यक गटविकास अधिकारी सविताताई शेप मॅडम यांनी महिलांनी महिलांना शिक्षणाबरोबरच संस्कार जोपासण्याची गरज आहे असे सांगितले. व आबा महाराज मेहरकर यांनी सांगितले की महिलांचा सन्मान केला पाहिजे.
यावेळी बनकर मॅडम, अनुसया वायबसे, ग्रामपंचायत सदस्या, मंगल राम गलांडे, सोनल अनिल देशमुख, मंदाकिनी गलांडे, सिमा काळे, निलम पवार, अरुणा गलांडे, पुजा गलांडे, माजी सरपंच सुनील बापू देशमुख, दिलीप गायकवाड, दगडु दळवे, बालाजी राऊत, धनराज नखाते, जालींदर गलांडे, सुनील महाराज गालफाडे, महादेव काळे सर, पत्रकार श्रीराम तांदळे, सचिन साखरे, हनुमंत गव्हाणे, अशोक देशमुख, नारायण नखाते, शंकर वाळके यांच्या सह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्योती सांबरे यांनी केले व प्रास्ताविक व आभारप्रदर्शन अनिल गलांडे यांनी केले.