• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सायं.दै. किसानचा पद्मपाणीच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने सन्मान

ByDeepak Gitte

Mar 6, 2023

सायं.दै. किसानचा पद्मपाणीच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने सन्मान

बीड प्रतिनिधी/ND NEWS

हा गौरव किसानच्या असंख्य वाचकांचा -संपादक कामरान शेख

बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला दिमाखदार सोहळा

बीड । प्रतिनिधी-: अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या सायं. दै. किसानने पत्रकारिता क्षेत्रात आपल्या वास्तवादी- निर्भिड व परखड लेखणीने वेगळा ठसा उमटविला आहे. कष्टकरी-वंचित-उपेक्षीतांचे प्रश्न मांडून व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह परखडपणे निर्माण करण्याचे धाडस दाखवून वृत्तपत्र व पत्रकारितेचे मुल्य जपत वाटचाल करणार्‍या सायं. दै. किसानच्या पत्रकारीतेची पद्मपाणि प्रतिष्ठाने दखल घेत आज रविवारी (दि.5) पद्मपाणीच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात संपादक कामरान शेख यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, एसपी नंदकुमार ठाकूर व जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आज पद्मपाणि प्रतिष्ठानने जो सन्मान सायं. दै. किसानचा केलेला आहे, तो खरा म्हणजे किसानच्या असंख्य वाचकांचा हा गौरव आहे, असे भावोद्गार संपादक कामरान शेख यांनी केले. बीड येथे रविवारी पार पडलेलेला पद्मपाणि प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. लोकशाचे संपादक विजयराज बंब होते. यावेळी बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, बीड नगर परिषदेच्या सीओ निता अंधारे, तहसिलदार सुहास हजारे, उमेश ढाकणे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, बीड जिल्हा उपकेंद्राचे खरात, पद्मपाणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरकसे यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड येथील पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा पद्मपाणि राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाचा 2022-23 चा पद्मपाणि राज्यस्तरीय  उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सायं. दै. किसानचे संपादक कामरान शेख यांचा गौरव करण्यात आला. वंचित-उपेक्षीत-कष्टकरी-सर्व सामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर निर्भिडपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवून संविधानिक लोकशाही मुल्य रुजविण्यासाठी किर्याशिल पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपून वास्तववादी व रोखठोक पत्रकारितेच्या दिशेने सायं. दै. किसानची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे अल्पावधीच सायं. दै. किसानने बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.  या पुरस्काराला उत्तर देतांना संपादक कामरान शेख म्हणाले की, हा पुरस्कार सायं. दै. किसानच्या असंख्य वाचकांचा-हितचिंतकांचा आणि जाहिरातदारांचा आज पद्मपाणि प्रतिष्ठानने खर्‍या अर्थाने सन्मान केला आहे. पद्मपाणि प्रतिष्ठानने दिलेला या पुरस्काराने सायं. दै. किसानची जवाबदारी अधिक वाढली आहे. व्यवस्थेचा बटीक न होता. भारतीय लोकशाही मजबूत व ती टिकवण्यासाठी तसेच भारतीय नागरिकांच्या हक्क-अधिकारासाठी सांय. दै. कटीबद्ध राहिल, अशी ग्वाही संपादक कामरान शेख यांनी यावेळी दिली. या पुरस्कार सोहळ्यासाठी शहरातील पद्मपाणि प्रतिष्ठानचे पदाधिकार्‍यांसह शहरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.