• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हा आढावा बैठक संपन्न, नवीन नियुक्त्या

◼️महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हा आढावा बैठक संपन्न, नवीन नियुक्त्या

◼️ND NEWS | बीड | परळी वैजनाथ

येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि.०४) सायंकाळी करण्यात आले होते. बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बैठकीत मान्यवरांच्या हस्ते अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने येथील श्री.शनी मंदिराच्या सभागृहात जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ भूषण कर्डिले, (नाशिक) राज्य कोषाध्यक्ष गजानन शेलार, ठाणे विभागाध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हा अध्यक्ष संगमेश्वर फुटके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राधाताई फकिरे, जिल्हा सचिव प्रा.मधुकर शिंदे, युवक आघाडीचे संभाजीनगर कार्याध्यक्ष अतुल बेंडे, कार्याध्यक्ष प्रा.प्रविण फुटके सह तालुका, शहरचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष विश्वांभर वाघमारे यांची मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून निवड करण्यात आली. तसेच डॉक्टर सेलच्या परळी तालुकाध्यक्षपदी डॉ प्रमोद बावरे,तालुका कार्याध्यक्षपदी छगन क्षिरसागर, युवक जिल्हा उपाध्यक्ष भागवत दत्तात्रय खुळे, जिल्हा संघटक गोविंद तुकाराम देशमाने,माजलगाव युवक तालुकाध्यक्ष विक्रम ओम प्रकाश शिंदे, तालुका उपाध्यक्ष किशोर शिवलिंग कानडे, युवक तालुका संघटक शुक्लेश्वर गणेश धारक यांच्या नियुक्त्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नाशिक महानगरपालिकेचे विरोधीपक्षनेते तथा कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी सांगितले की, समाजाने एकजूटीने राहून संघटन केले पाहिजे, तसेच समाजातील गोरगरीब लोकांना मदत करणे, स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजाच्या जनगणनेसाठी संघटनेच्या वतीने सहा अँप तयार करण्यात आले असून यावर महाराष्ट्रातील संपूर्ण तेली समाजाने नोंदणी करावी, यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, तर मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा संघटनेचे महासचिव डॉ भूषण कर्डीले यांनी सांगितले की, समाजातील युवकांनी मतभेद विसरून राजकारणात, समाजकारण एकजूटीने कार्य करावे, समाज संघटीत असणे ही काळाची गरज आहे. यावेळी सुनील चौधरी यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण फुटके तर आभार प्रा.मधुकर शिंदे यांनी केले. कार्यक्रमास तालुका अध्यक्ष मोहन राजमाने, शहराध्यक्ष राजकुमार भाग्यवंत, वैजनाथ बेंडें, शिवशंकर जठार, मलिकार्जुन साखरे, प्रा. गणेश परळीकर, पवन फुटके,अशोक बेंडे, नागनाथ भाग्यवंत सह तालुका अध्यक्षा श्रीमती लासे अनेक महिला पदाधिकारी, युवक आघाडीचे सदस्य, पदाधिकारी, तेली समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.