• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शहरातील माऊली पॅथॉलॉजी लॅब येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या हस्ते होणार शिबिराचे उद्घाटन..

हनुमंत गव्हाणे : केज ND NEWS |

लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब सेवाभावी संस्था, केवड व माऊली पॅथॉलॉजी लॅब,केज यांच्या वतीने दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान भव्य प्रतिबंधात्मक सर्वंकष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराचे उद्घाटन सहकारी संस्था, लातूरच्या विभागीय सहनिबंधक, डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या शुभहस्ते शनिवार दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 08 वाजता संपन्न होणार आहे.केज शहरातील रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये प्रतिबंधात्मक रोग निदान तपासणी शिबीर अत्यल्प दरात उपलब्ध असणार आहे.गेल्या 17 वर्षापासून केज शहरात आयोजकांच्या वतीने हे शिबिर सातत्याने होत आहे. या शिबीरातून अनेक जणांनी लाभ घेतला आहे. या वर्षीही हे शिबीर 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधी मध्ये होत आहे. अनेक जणांना असा प्रश्न येतो की, आम्हाला तर कुठलाच आजार नाही, मग या तपासणीची काय आवश्यकता आहे ? अनेक दीर्घ मुदतीचे आजार खुप वाढेपर्यंत जाणवत नाहित. जेव्हा जाणवते तेव्हा पर्यंत शरीरावर त्याचा बराच दुषपरिणाम झालेला असतो, या उलट आजार वेळीच लक्षात आले तर भविष्यात होणारे धोके टाळता येतात. त्यामुळे वय वर्ष 35 व त्यापेक्षा अधिक असणाऱया शहरवासीयांनी या तपासण्या करून भविष्यातील धोका टाळावा तसेच नाव नोंदणीसाठी गरजूनी श्री.दीपक कोल्हे, 9658129696,
श्री नामदेव (बप्पा) गायकवाड 9422244612, साक्षी (ताई) हंगे8805554477श्री आनंद धाट 7020671268, यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब सेवाभावी संस्था,केवड व थायरोकेअर व फोरकास्ट प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर चेकअप माऊली पॅथॉलॉजी लॅब,केज यांच्या वतीने करण्यात येत आहे.