• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

विशाल साळुंके यांची मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

ByDeepak Gitte

Feb 23, 2023

विशाल साळुंके यांची मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार विशाल साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज येथे ही घोषणा केली आहे.. परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपेपर्यंत म्हणजे ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ते अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील.. उर्वरित कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येईल..
विशाल साळुंखे गेली अनेक वर्षे परिषदेशी जोडले गेलेले आहेत.. यापुर्वी ते परिषदेचे औरंगाबाद विभागीय सचिव म्हणून कार्यरत होते.. विभागीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी विभागात परिषदेचे संघटन मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.. विशाल साळुंके यांनी बीड जिल्ह्यात नव्याने सदस्य नोंदणी करून संघटन भक्कम करावे असे त्यांना सांगण्यात आले आहे..
एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी विशाल साळुंके यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत…