• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

डिझेल चोरीतील आरोपी पोलिसांनी घेतला ताब्यात  आरोपी आणि पोलिस कारवाई दरम्यान  घडला थरार

डिझेल चोरीतील आरोपी पोलिसांनी घेतला ताब्यात  आरोपी आणि पोलिस कारवाई दरम्यान  घडला थरार

हनुमंत गव्हाणे : केज ND NEWS |

डिझेल चोरीतील आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात आरोपी आणि पोलिस कारवाई दरम्यान घडला थरार प्रकार रात्रीच्या वेळी रस्त्यावर किंवा हॉटेल समोर उभ्या असलेल्या वाहनातील इंधन टाकीचे कुलूप तोडून इंधन चोरणाऱ्या एका सराईत चोराला केज पोलिसांच्या गुन्हेगार शोध (डी बी) पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत केलेले केज पोलिसांचे गुन्हेगार शोध (डी बी) पथकाने गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यासाठी सरसावले आहेत. या पथकात अनेक अवघड आणि किचकट गुन्ह्यांचा तपास लावणारे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, गुन्हेगारांचा पत्ता काढण्यात तरबेज असलेले पोलीस नाईक दिलीप गित्ते, सिंघम लेडी पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे, त्रिंबक सोपणे, शमीम पाशा, आनंद इनकर, शहादेव मेहेत्रे, गंभीरे मॅडम अशी कर्त्यव्यदक्ष टीम आहे. दरम्यान केज पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी रस्त्यावर किंवा हॉटेल समोर वाहने उभी करून चालक आराम करीत असतात ही संधी साधून वाहनांच्या इंधन टाकीचे कुलूप तोडून नळीच्या साहाय्याने इंधन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. या इंधन चोरी प्रकरणी या पोलीस पथकाला एका गुन्हेगाराची माहिती मिळताच दि. २३ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, महिला पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे, त्रिंबक सोपणे, शमीम पाशा, आनंद इनकर, शहादेव मेहेत्रे, गंभीरे मॅडम यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पहाटे उस्मानाबाद जिल्ह्यातील आंदोरा-कन्हेरवाडी पाटी ता. कळंबच्या दरम्यान असलेल्या पारधी वस्तीवर गुन्हेगाराला पकडण्यासाठी दबा धरून बसले. परंतु आरोपी काही घराच्या बाहेर येत नव्हता आणि तो बेसावध असताना त्याला ताब्यात घ्यायचे; असा पोलिसांचा मनसुबा होता. पहाटे पासून अंधारात पोलीस पथक घराजवळ दबा धरून बसले होते. त्या नंतर सकाळ होताच संशयित आरोपी बाबूशा उर्फ पकल्या भीमराव काळे हा घराच्या बाहेर येताच पोलिसांनी त्याला झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी सराईत असल्याने त्यांने नारळाच्या झाडाचा बुंधा पकडला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना खूप परिश्रम करावे लागले. तसेच त्याने मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे त्याचे नातेवाईक जमा झाले. त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना विरोधी करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या कष्टाने पोलिसांनी त्याला उचलून गाडीत बसविल्या नंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या गाडीपुढे येऊन गाडी देखील अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीसांची दमछाक झाली. मात्र त्या नंतर पोलिसांनी त्यांचा विरोध न जुमानता बाबूशा उर्फ पकल्या काळे याला ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात घेऊन आले. आता तो केज पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या पहाटेच्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, महिला पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे, त्रिंबक सोपणे, शमीम पाशा, आनंद इनकर, शहादेव मेहेत्रे, गंभीरे मॅडम हे सहभागी झाले होते. सराईत गुन्हेगार बाबुशला उर्फ पकल्या काळे याला ताब्यात घेतल्या बद्दल पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.