• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लातूर येथे महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

ByND NEWS INIDIA

Feb 20, 2023

लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी : खा.सुधाकर शृंगारे यांचा पुढाकार

महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

ND NEWS | विकास राठोड: लातूर शहर प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त
पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत
अनोख्या अध्दतीने अभिवादन केले. यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी पुढाकार घेतला. यंदा अनोख्या पद्धतीने विविध उपक्रमांनी शिवजयंती आणि तसेच संत सेवालाल जयंती सुद्धा साजरी करण्यात आली. यावेळी हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
दर वर्षी खा. सुधाकर शृंगारे आपल्या कल्पनेतील महापुरुषांची जयंती साजरी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त ७२ फुटी पुतळ्यावर ही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली होती. आता यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधत लातुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकती पुतळ्यावर ही रविवारी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.