• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

छत्रपती शिवरायांच्या राज्यात महिला सुरक्षित होत्या- शेख सुभान अली

छत्रपती शिवरायांच्या राज्यात महिला सुरक्षित होत्या- शेख सुभान अली

नव्या पिढींना शिवरायांचा विचार पोहोचविण्याचे कार्य निरंतर आवश्यक – मुख्य अभियंता भदाणे

परळी प्रतिनिधी

ND NEWS | रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनी सुरक्षित होत्या असे प्रतिपादन दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानचे अध्यक्ष शेख सुभान अली यांनी केले. ते मराठा सेवा संघ प्रणित शिवजयंती जन्मोत्सव शक्तीकुंज वसाहत परळी येथे ३९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे हे होते. तर प्रमुख पाहुणे एच. के. अवचार, नाशिकचे कार्यकारी अभियंता वाय बी चौधरी , कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, डी डी कोकाटे, व्यवस्थापक सुनील पवार, चैतन्य जाधव,अभिमन्यू भिसे ,संदीप पाटील, वरून पौळ, चेतन रणदिवे,आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवजयंती समितीचे अध्यक्ष राजेश बेंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुढे बोलताना शेख सुभान अली म्हणाले की सध्या देशामध्ये महिलांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. जगाच्या पाठीवर भारतात सर्वाधिक महिला अत्याचाराचे प्रमाण आहे. भारतात प्रत्येक दिवशी 87 महिलावर बलात्कार होतात असे त्यांनी आकडेवारी सह सांगितले. छत्रपती शिवरायांच्या विषयी बोलत असताना त्यांनी सांगितले छत्रपती शिवरायांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. शिवरायांच्या राज्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या महिला सुरक्षित होत्या त्यांच्या केसालाही धक्का लागत नव्हता असेही यावेळी ते म्हणाले.
शिवरायांचे राज्य हे लोक कल्याणकारी राज्य होते त्याबरोबरच 18 पगड जातींना सोबत घेऊन आणि विशेषतः मुस्लिम राज्यांच्या विरोधात सत्तेच्या लढाया असतानाही सर्व प्रमुख विभागाची जबाबदारी मुस्लिम सरदारांना शिवरायांनी सोपीवली होती. एवढा प्रचंड मुस्लिम समाजाविषयी आत्मविश्वास शिवरायांना होता.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अल्पसंख्याक समाजाला अधिकार दिले आहेत तेच हक्क अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना परळी वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे म्हणाले की, शिवरायांच्या काळात निर्माण केलेली विविध प्रणाली आणि यंत्रणा आजही आदर्श असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या पिढींना छत्रपती शिवरायांच्या विचारांची ज्योत कायम तेवत ठेवले पाहिजे.नव्या पिढीपर्यंत विचार पोहोचविण्याचे कार्य निरंतर आवश्यक असल्याचे मुख्य अभियंता भदाणे यांनी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. क्रिकेटमध्ये सचिन कानाळे, स्वप्निल लुटे आणि आनंद मेकले तर तर महिला क्रिकेटमध्ये पल्लवी वानखेडे आणि पूनम पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप लेंडवे आणि अमर ढोबळे यांनी केले तर संदीप काळे यांनी आभार प्रदर्शन केले