• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

वैद्यनाथ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर

वैद्यनाथ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)…

ND NEWS | येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांनी अकृषी विद्यापीठ तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत संप पुकारला असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये वैद्यनाथ महाविद्यालयातील जवळपास शंभर टक्के शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यभरात अकृषी विद्यापीठ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 20 फेब्रुवारीपासून विविध मागण्यांसाठी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत लागू करणे, सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे,2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू मात्र त्या कालावधीतील वेतनाची फरकाची थकबाकी अदा करणे विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी मागण्याचा यामध्ये समावेश आहे. या संपात वैद्यनाथ महाविद्यालय येथील 39 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत येणारा काळ हा परीक्षांचा असल्याकारणाने या बेमुदत संपाचा विद्यार्थ्यांना परीक्षांचे फीस भरणे हॉल तिकीट मिळवणे आदींबाबत अडचणी येत असून याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनावर रोडे यू. एन., वाघुळकर यु.आर., चव्हाण बी. एस., जरांगे ए. एस., एस. आर. धर्माधिकारी, डी. एम. वाघबिजे, लव्हारे यु. आर., पी.एम. नरवणे, जी. एन. जोशी, अनिल जगतकर, एस. बी. फड आदि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.