• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आता राजस्थान कोटा येथील शिक्षण घेता येणार परळी शहरात;विद्यार्थी पालकांची गैरसोय होणार दूर

आता राजस्थान कोटा येथील शिक्षण घेता येणार परळी शहरात;विद्यार्थी पालकांची गैरसोय होणार दूर

राजस्थान कोटा येथील रेजोनन्स ने महाराष्ट्रातून निवडले परळी येथील फाउंडेशन स्कूल

5 एप्रिल 2023 पासून फाउंडेशन स्कूल येथे सुरू होणार अभ्यासक्रम

परळी (प्रतिनिधी):-

परळी येथील नावलौकिक असलेल्या फाउंडेशन स्कूलने पारंपारिक शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत परळी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक, उच्च दर्जाचे व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राजस्थान कोटा येथील नामांकित शिक्षण संस्था रेजोनन्सने फाउंडेशन सुपर बॅचेस सुरू केल्या आहेत. याचे उद्घाटन रेजोनन्स चे उपाध्यक्ष श्री कीर्तीसिंग संगोरा यांच्या हस्ते दि. 28 जानेवारी 2023 करण्यात आले आहे. दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी फाउंडेशन स्कूल येथे प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना राजस्थान कोटा येथे चालणारे शिक्षण देऊन एक सुवर्णसंधी परळी येथील फाउंडेशन स्कूलने उपलब्ध करून दिली आहे. दि.5 एप्रिल 2023 पासून सदरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय दूर होत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी परळीत उपलब्ध होत असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा लाभ घ्यावा आणि आपली शैक्षणिक प्रगती साध्य करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजयप्रकाश तोतला यांनी केले आहे.

IIT, NEET व NTSE, MTSE, NSO,IMO, NSEJS सारख्या स्पर्धात परिक्षेचे उच्च व आधुनिक पद्धतीने गुणात्मक शिक्षण देणाऱ्या भारतातील या परीक्षेची नाव नोंदणी गुगल फार्म द्वारे राजस्थान कोटा येथे केली जाणार असून इयत्ता 6 वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व स्पर्धा परीक्षा ची तयारी करून घेण्यासाठी अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वृंद यांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षित व अनुभवी तज्ञ शिक्षक वृंद सर्व स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी दररोज प्रात्यक्षिक परीक्षा, प्रत्येक आठवड्याला मायनर टेस्ट, विशेषशंका निरसन वर्ग हे या नव्या फाउंडेशन सुपर बॅचचे वैशिष्ट्ये असणार आहे. सुपर बॅचमधील विद्यार्थ्यांना रेजोनन्स कोटा राजस्थान येथील कार्यालयातून नियमित अभ्यासाचा पाठपुरावा केला जाणार आहे.

पारंपारिक परीक्षेशिवाय आपल्यातील शैक्षणिक कलागुण वाढविण्यासाठी तसेच उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठीची ही आगळीवेगळी संधी असून विद्यार्थी व पालकांनी एकदा भेट देऊन अभ्यासक्रमाची माहिती घ्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजयप्रकाश तोतला यांनी केले आहे. आम्ही 26 वर्षापासून फाउंडेशन स्कूलच्या माध्यमातून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहोत. यापुढेही अभ्यास गुरुकुल आणि रेजोनन्सच्या माध्यमातून पारंपारिक शिक्षणातून एक पाऊल पुढे टाकत बदलत्या शिक्षण प्रणालीनुसार व स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना पायाभूत शैक्षणिक सुविधा देत त्यांना धाडसाने परीक्षेसाठी तोंड देण्याची शक्ती आम्ही देणार असल्याचे अध्यक्ष विजयप्रकाश तोतला यांनी सांगितले.

फाउंडेशन सुपर बॅचेसचे वैशिष्ट्ये

विद्यार्थ्यांची NTSE, NSO, IMO, NSEJS, MTSE, IIT & NEET FOUNDATION DOUBT CLEARING CLASS. COURSE इत्यादी स्पर्धात्मक परिक्षेची विशेष तयारी. विद्यार्थ्यांचे साप्ताहिक परिक्षेद्वारे नियमित मुल्यांकन विद्यार्थ्यांचे शंका निरसन व मुळ संकल्पना स्पष्ट करण्यासाठी राजस्थान कोटा येथुन चालणारा RESO SIR अॅप ज्यामध्ये विषय व संकल्पना निहाय शिक्षकांचे रेकॉर्डेड व्हिडीओ. सुपर बॅचमधील विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था व स्वअध्यायन कक्ष. सुपर बॅचेसला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य. प्रत्येक विद्यार्थ्याचे रेजोनन्स कोटा येथील मुख्य कार्यालय येथे नाव नोंदणी होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
8168531690, 7620072002, 93259 05051या क्रमांकावर तसेच अधिक माहितीसाठी https://youtu.be/DhrnDmspOF4

या लिंक वर तर विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन किंवा क्युआर कोड किंवा https://forms.gle/n2KjKkdhTbwEjz2A6

संपर्क साधावा.