• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी वीज निर्मिती केंद्रातून 625 मेगावॉट वीज निर्मिती

परळी वीज निर्मिती केंद्रातून 625 मेगावॉट वीज निर्मिती

नितीन ढाकणे | परळी वैजनाथ

महावितरणकडुन मागणी वाढल्याने परळी नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तिन्ही संच सुरु झाले असुन बुधवार दि.8 फेब्रुवारी रोजी तीन्ही संचातुन 625 मेगावॅट एवढी वीज निर्मिती होत आहे.
परळी येथील नवीन औष्णिक वीज निर्मिती केंद्रात 250 मेगावॉट चे 3 संच कार्यान्वित असून काही दिवसांपूर्वी यातील संच क्र. 7 हा वार्षिक देखभालीसाठी बंद होता. काम पूर्ण झाल्यानंतर व महावितरणकडुन मागणी वाढल्याने संच क्र. 6 ,7 व 8 हे आता पूर्णक्षमतेने कार्यान्वित झाले आहेत.बुधवारी या तीन संचातुन सरासरी 625 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.सध्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रात दीड लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. 20 ते 22 दिवस चालेल इतका पुरेसा साठा असल्याचे कोळसा हाताळणी विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश गर्जे यांनी सांगितले.

*कठीण परिस्थितीत विजनिर्मीती*

महानिर्मिती कंपनी कठीण परिस्थितून मार्गक्रमण करीत असून या परिस्थितीत सर्वानी आप आपली कर्तव्य जर चांगल्या प्रकारे पार पडली तर त्यातून भविष्यात येणाऱ्या सर्व जवाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे पार पडून परळी औष्णिक वीज केंद्रच्या भविष्य उज्वलतेकडे नेण्यासाठी कटीबद्ध राहू.

*पी.एन.भदाणे*
*मुख्य अभियंता*
*परळी औष्णिक विद्युत केंद्र.*