• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य,आधीची 2 आश्चर्य दिल्लीत!

फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य,आधीची 2 आश्चर्य दिल्लीत!

ND NEWS :
देवेंद्र फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य आहे. तर आधीची 2 आश्चर्य दिल्लीत बसलेत, अशी टीका संजय राऊत यांनी आज केली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय वर्तुळात एकानंतर एक वक्तव्ये केली जात आहेत. काल फडणवीस यांनी यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. निवडणूक निकालानंतर शिवसेनेने आधी आमचा विश्वासघात केला आणि नंतर राष्ट्रवादीने केला, असा आरोप फडणवीस यांनी केला. मात्र शिवसेनेने भाजपाचा विश्वासघात केलेला नाही. फडणवीस खोटं बोलत आहेत, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. तर असं बोलणाऱ्या फडणवीसांनाच त्यांनी दहावं आश्चर्य अशी उपमा दिली आहे.