• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

१९ नोव्हेंबर रोजी बँका बंद देशव्यापी संपाची घोषणा 2 दिवस बँका राहणार बंद

ByND NEWS INIDIA

Nov 18, 2022

१९ नोव्हेंबर रोजी बँका बंद देशव्यापी संपाची घोषणा 2 दिवस बँका राहणार बंद

ND NEWS:

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (ATBEA) ने १९ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे बँकेतील कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संघटनेने (AIBEA) आपल्या मागण्यांसंबंधित हा संप पुकारला आहे. बँक ऑफ बडोदाने एक निवेदन जारी केले आहे की त्यांना AIBEA कडून नोटीस मिळाली आहे. १९ नोव्हेंबरला बँक संपावर जाण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने बँकांच्या खासगीकरणाविरोधात आणि बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे लग्नाच्या या मोसमात बँकांच्या संपामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. बँकांच्या या संपामुळे कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. शनिवारी बँक संपानंतर रविवारी बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत २ दिवस कामकाजावर परिणाम होणार आहे. येता शनिवार हा महिन्यातील तिसरा शनिवार आहे. या दिवशी बँकेला सुट्टी नसते. संपामुळे, काही एटीएममध्ये रोखीची समस्या असू शकते