• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळीतील सर्वात दर्जेदार दिपावली अंक-अजय मुंडे

ByND NEWS INIDIA

Nov 17, 2022

देवदेवतांच्या फोटोंनी कव्हर पेजची परपंरा जोपासली-राजेश देशमुख

सुंदर छपाई, वाचनीय लेख असा अंक-विनोद सामत

संग्रहणीय, वाचकांच्या पसंतीस उतरणारा अंक-अ‍ॅड.गोविंद फड
——————————————–
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) 30 वर्षापासून अखंडपणे जनतेच्या सेवेत असणारा वाचनीय असा परळी समाचारच्या दिपावली अंकाचे प्रकाशन जि.प.गटनेते अजयजी मुंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेशजी देशमुख तर प्रमुख पाहुणे सर्वश्री वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोदसेठ सामत, विरशैव महासभेचे जिल्हा अध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरूजी, परळी मार्केट कमेटीचे सभापती अ‍ॅड.गोविंदभाऊ फड,
जेष्ठ शल्य चिकित्सक डॉ.हरिश्चंद्र वंगे दादा, माजी नगराध्यक्ष दिपकनाना देशमुख, पोलिस निरीक्षक मारोती मुंडे व इतर सन्माननीय उपस्थित होते.
प्रास्ताविक परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे संचलन जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी केले.
गेली 30 वर्षापासून परळी समाचार वृत्तपत्र हे नियमित पणे निघत असून ते दर्जेदार व कथा कविता, लेख, मुलाखती यांनी भरगच्च असल्याचे बीड जि.प.गटनेते अजयजी मुंडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश देशमुख म्हणाले की, प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी परळी समाचारने कव्हरपेजची परपंरा कायम राखली व वैद्यनाथ ज्योतिर्लिंगच्या परिसरातील असलेले जिरेवाडीच्या जागृत देवस्थान सोमेश्वर देवता चे फोर कलर मुखपृष्ठ छापले, आतील अंकात सुद्धा सर्वच लेख वाचनीय असल्याचे ते म्हणाले.
अत्यंत सुंदर छपाई व वाचनीय लेख,कविता असलेला अंक म्हणजे परळी समाचारचा दिवाळी अंक असे प्रतिपादन वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोदसेठ सामत यांनी केले.
संग्रहणीय व वाचकांच्या पसंतीस उतरणारा कथा, कविता, लेख यांचा त्रिवेणी संगम असणारा असा हा वाचण्यासारखा परळी समाचारचा दिपावली अंक असल्याचे मार्केट कमेटीचे सभापती अ‍ॅड.गोविंदभाऊ फड यांनी परळी समाचारला शुभेच्छा देत असताना सांगितले.
तर भाजपाचे जेष्ठ तथा विरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा इटके, शल्य चिकित्सक डॉ.हरिश्चंद्र वंगे दादा, शिवसेनेचे नेते तथा वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायणराव सातपुते, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती मुंडे, माजी नगराध्यक्ष तथा सप्तश्रृंगी दुर्गोत्सव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिपक देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर इत्यादी मान्यवरांनी परळी समाचार वृत्तपत्रास व संपादक आत्मलिंग शेटे यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सर्वश्री रंगनाथ खके गुरूजी, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, मार्केट कमिटीचे सचिव बलवीर रामदासी, ओमप्रकाश सारडा, पी.एस.आय.श्री.पौळ, दै.मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, डॉ.शिवकांत अंदुरे, युवा नेते जालींदर नाईकवाडे, वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, मातोश्री ऑफसेटचे संचालक विठ्ठलराव साबळे, परळी नगरीचे संपादक दत्ता शिवगण, अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा, मनोज नरवणे आदी मान्यवर उपस्थित होते.