• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सरपंच राजेभाऊ फड यांनी कन्हेरवाडीतील मंदिरांना केले पाच लक्ष रुपयांचे वैयक्तिक आर्थिक सहकार्य

ByND NEWS INIDIA

Dec 7, 2022

वनमारोती मंदिर, महादेव मंदिर,नारोबा मंदिर,बेलाचा महादेव या मंदिराचा होणार जिर्णोद्धार

 

कन्हेरवाडी येथील प्रमुख मंदिर अनुक्रमे वनमारोती मंदिर,महादेव मंदिर (कावड),नरोबा मंदिर व बेलाचा महादेव(मोरवंडी) या मंदिर जिर्णोद्धारासाठी व बांधकामासाठी कन्हेरवाडीचे लोकप्रिय सरपंच राजेभाऊ फड यांनी वैयक्तिक पाच लक्ष रुपयांचा धनादेश मंदिर समितीकडे सुपुर्द केला आहे.

कन्हेरवाडी येथील वन मारोती मंदिर प्रसिद्ध आहे,गावातील तसेच इतर भाविक दर्शनासाठी आवर्जून येत असतात.या मंदिरांचा जिर्णोद्धार व्हावा हि बाब मंदिर समिती व प्रमुख नागरिकांनी राजेभाऊंच्या निदर्शनास आणून दिली, प्रमुख मागणीचा गांभीर्याने विचार करून राजेभाऊंनी तात्काळ वैयक्तिक पाच लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

सरपंच राजेभाऊ फड हे वैयक्तिक मदत करण्यात अग्रेसर आहेत,मंदिर जिर्णोद्धारासाठी केलेल्या वैयक्तिक आर्थिक सहकार्यासाठी गावातील मंदिर समिती,प्रमुख नागरिक व भाविक भक्तांनी सरपंच राजेभाऊ फड यांचे आभार मानले आहेत.