• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

एकनाथ मांडवकर यांचा असाही प्रामाणीकपणा, सापडलेली सोन्याची अंगठी केली परत

ByND NEWS INIDIA

Sep 12, 2022

एकनाथ मांडवकर यांचा असाही प्रामाणीकपणा,
सापडलेली सोन्याची अंगठी केली परत

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोंबरे

एकीकडे सद्या शहरात चोरी लुटमारी , घरफोडी सारख्या घटना उघडकीस येत असतानाच आता एक प्रामाणिक पणाची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला सापडलेली सोन्याची अंगठी परत केल्याने कौतुक केले जात आहे.
शहरातील भगतसिंग चौक येथे सलुन चा व्यवसाय करित असलेले एकनाथ मांडवकर रा.वाघदरा हे दि.१० सप्टेंबर ला शनिवारी दुपारी एक वाजता चे सुमारास नृसिंह व्यायाम शाळेतील गणपतीचा महाप्रसाद घेण्यासाठी गेले असता त्यांना एक सोन्याची अंगठी अंदाजे किंमत ३० हजार रुपयाची सापडली. दरम्यान त्याच ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करत असलेले व नृसिंह व्यायाम शाळेचे जुने कार्यकर्ते विलास गोपाळराव आसुटकर यांची सोन्याची अंगठी हरवल्याने ते अंगठीचा शोधु घेवु लागले, आखाड्याच्या परिसरात हा प्रकार लक्षात येताच एकनाथ मांडवकर ने विलास आसुटकर यांच्याकडे सोन्याची अंगठी परत करून प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.