• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

“कसं काय पाटील बरं आहे का, दिल्लीमध्ये काय झालं ते खरं आहे का?”

ByND NEWS INIDIA

Sep 12, 2022

संभाजीनगर : दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी व्यासपीठावर बोलू न दिल्याचं नाराजी नाट्य राज्यभर चर्चेचा विषय ठरला.  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याचा उल्लेख करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. पैठणमधील आयोजित सभेमध्ये बोलताना शिंदे यांनी, कसं काय पाटील बरं आहे या गाण्याच्या ओळी म्हणत जयंत पाटील यांच्यावर मार्मिक टीका केली.

जुन्या चित्रपटामध्ये एक गाणं होतं जे फेमस झालं होतं. कसं काय पाटील बरं आहे काल दिल्लीत झालं ते खरं आहे का?, जयंत पाटील यांनी दादांना बोलून दिलं नाही. त्यामुळे दादा निघून गेले रागारागाने, कारण जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं मात्र त्यांना होता आलं नाही, दादांची दादागिरी काम करूव गेली. याचं शल्य पाटलांच्या मनात होतं म्हणून महाराष्ट्रात त्यांना थांबवता येत नाही म्हणून दिल्लीत त्यांना थांबवल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांची खरी शिवसेना कुठही याचं उत्तर आजच्या या सभेने दिली आहे. पैसे देऊन जमवलेली ही गर्दी नाही. प्रेमाने आलेली ही गर्दी आहे. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पसंती देणारी ही गर्दी आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी एकच शिकवण दिली आहे. जे होणार असेल तेच बोला. मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वत:चं ही ऐकत नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.