• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

औ.वि.केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मान

ByND NEWS INIDIA

Sep 12, 2022

औ.वि.केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मान

कोरोना काळात केलेल्या सेवेबद्दल कोरोना वॉरियर्स पुरस्कार देऊन राजभवनात केला सन्मान

बीड प्रतिनिधी :

परळी औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे सन्मान करण्यात आला. कोरोना काळात औष्णिक विद्युत केंद्रात ऑक्सिजन प्लांट अतिशय तातडीने उभारण्यात मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा सिंहाचा वाटा होता. ऑक्सिजन प्लांटमुळे हजारो नागरिकांचे कोरोना काळात प्राण वाचले होते. आव्हाड यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा मुंबईतील राजभवन येथे कोरोना वारियर्स हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सन्मान केला.यावेळी प्रसिध्द सिनेअभिनेता राजा मुरात

कोरोना काळात संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात अंबाजोगाई व परभणी शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. याच काळात औ.वि केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात ऑक्सीजन प्लांट तातडीने कार्यान्वित करून कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात प्लांट च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला होता. याची दखल घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते कोरोना वॉरियर्स म्हणून सन्मान करण्यात आला.