• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अखेर… बहुप्रतिक्षित सातवा वेतन आयोग महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागु

ByND NEWS INIDIA

Aug 29, 2022

अखेर… बहुप्रतिक्षित सातवा वेतन आयोग महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागु

मनोज सरमोकदम यांच्या प्रयत्नांना यश

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोंबरे

महाराष्ट्रातील सगळ्या कर्मचान्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन चार-पाच वर्षे पूर्ण झाली तरी अशासकीय महाविद्यालयीन जुन्या शिक्षकेतर कर्मचान्यांना अजूनही सातवा वेतन आयोग लागला नव्हता. त्या अनुषंगाने शिक्षकेतर कर्मचारी महासंघ महाराष्ट्र यांनी आजपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला व मंत्रालयाच्या पायऱ्या चढल्या, परंतु महाराष्ट्र शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नव्हत्या असा आरोप भाजपा उपाध्यक्ष मनोज सरमोकदम यांनी केला. गेला कुठल्या ना कुठल्या कारणाने अडचणी येत गेल्या व संघटनेचे प्रयत्न सार्थक लागत नव्हते परंतु शासन बदलले आणि हालचालींना वेग आला. त्यातच वनी शहर भाजपा उपाध्यक्ष मनोज सरमोकदम यांनी कंबर कसली व सतत पाठपुरवठा केला त्यांच्या मदतीला महासंघ सुद्धा धावून आला. दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी मनोज सरमोकदम यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच थेट पत्राद्वारे फॅक्स केला व सगळ्या समस्या समोर ठेवल्या त्या सातवा वेतन आयोग व सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी विनंती केली. त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली व दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी मंत्रालयातून चक्क शासन आदेशच धडकला. त्यात माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाभ देण्यात यावा असे नमूद केले. सोबतच २६ ऑगस्ट २०२२ रोजी शासन स्तरावरून सहसंचालक अमरावती यांना सुद्धा अमरावती विभागातील सर्व जुन्या कर्मचाऱ्यांना हा लाभ तात्काळ लागू करण्याचे आदेश पारीत केले. आता कर्मचाऱ्यांना लवकरच हे दोन्ही लाभ मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या व संघटनेच्या वतीने देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले असल्याचे भाजप उपाध्यक्ष मनोज सरमोकदम यांनी सांगितलेले आहे.