• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार आम्हाला पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील – धनंजय मुंडे

पट्टीवडगाव व घाटनांदूर येथे धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी

महापुरुषांचे विचार महत्वाचे त्यांना जातीत मर्यादित ठेवणे अपेक्षित नाही – मुंडेंचा मौल्यवान संदेश

परळी (दि. 28) – वंचित, शोषित समाजाचा आवाज आपल्या परखड लेखणीतून बुलंद करणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार व त्यांचे साहित्य अजरामर आहेत, आम्हाला पुढील अनेक पिढ्या त्यांचे विचार सत्कार्यासाठी प्रेरणा देत राहतील, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

परळी मतदारसंघातील पट्टीवडगाव व घाटनांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव कार्यक्रमांना उपस्थित राहून धनंजय मुंडे यांनी लोकशाहिरास अभिवादन करत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत आपले मत व्यक्त केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या तळपत्या लेखणीतून शोषितांचा आवाज बुलंद केला, वंचित-पीडित समाजाला न्याय देताना त्यांनी कधीही जात पाहिली नाही, त्यामुळे अण्णाभाऊ साठेंसारख्या महापुरूषांना कोणत्याही जातीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे आचरण करणे अपेक्षित असल्याचे धनंजय मुंडे यावेळी बोलताना  म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी आज सकाळी पट्टीवडगाव येथील जयंती उत्सवात सहभाग घेतला यावेळी दयानंद कांबळे, शिवाजीराव शिरसाट, सुधाकर माले, चंद्रकांत वाकडे, महादेव लव्हारे, विश्वंभर फड, दिनकर लव्हारे, सुभाष वाघमारे, नारायण जाधव, सोपानराव तोंडे, काशिनाथ कातकडे, बळीराम लव्हारे, केरबा कांबळे, दिलीप लव्हारे, हनुमंत मडके, सुरेश वाकडे, उत्तमराव वाकडे, बाळासाहेब काळे, वसंत उदार, श्रीमती प्रभावती कांबळे, महादेव वाकडे, अमोल वाकडे, बाळासाहेब वाकडे, नारायण लव्हारे, बाळासाहेब जाधव, उपाडे साहेब, रमेश मस्के, धोंडीराम शिंदे, करपे साहेब, प्रकाश चाटे, ज्योतिबा लव्हारे, दशरथ कांबळे, महादेव कांबळे, लक्ष्मण कांबळे, बळीराम आडे, भागवत मुंडे, महादेव लव्हारे, शेख शबीर, कबीर वाघमारे, हारिश्चंद्र मडके, विलास कांबळे यांसह आदी उपस्थित होते.

तद्नंतर घाटनांदूर येथे आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या बौद्ध समाजासाठी व मातंग समाजासाठी अशा दोन सभागृहंसाठी प्रत्येकी 20 लाख प्रमाणे दोन सभागृहांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, माऊलीबप्पा जाधव, युवक नेते शिवाजी शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, सुधाकर माले, अजितदादा देशमुख, बाळासाहेब देशमुख, विजयकुमार गंडले, रघुनाथ कुचेकर, कचरू तात्या खळगे, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, बंडू तात्या गीते, सत्यजित शिरसाट, कमलाकर मिसाळ, सुरेश जाधव, बन्सी साहेब जाधव, पिराजी वैद्य, मुरलीधर साळवे, सुधाकर शिंगारे, रामभाऊ वैद्य, मुर्तजा शेख, मेहबूब भाई शेख, पांडुरंग मिसाळ, धनंजय शिंदे, उत्तम जाधव, अनिल जाधव, हनुमंत गायकवाड,मारुती माने, अरुण मिसाळ, सुरेश मिसाळ, सादिक कुरेशी, सुभाष वाघमारे, वसंत उदार यांसह आदी उपस्थित होते.