• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले,*

ByND NEWS INIDIA

Aug 28, 2022

*भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले,*

*वणी- मुकुटबन मार्गावरील मानकी जवळ घडली घटना*

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोंबरे

वणी- मुकुटबन मार्गावरील मानकी गावाजवळ भरधाव वेगाने येत असलेल्या एका विस्फोटक वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीस्वारास मागुन धडक देऊन चिरडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
चरण पांडुरंग ठेंगणे (५४) रा. मानकी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार इसमाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मानकी येथील शेतकरी चरणदास ठेंगणे हे रविवारी दुपारी २: ३० वाजताच्या सुमारास आपल्या होंडा फॅशन दुचाकी क्रमांक-एम एच-२९ डब्लु- ५०४० ने का जराही कामानिमित्त वणीकडे निघाले होते. घरून निघतांना त्यांनी मुलगा आशिष ठेंगणे याला शेतात जाण्यासाठी मानकी बस स्टँड पर्यन्त दुचाकीवर सोडूले. आणि वणीकडे निघाले. मानकी बसस्टँड पासून एक किलोमीटर समोर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या विस्फोटक वाहतूक करणाऱ्या पिकअप क्र. (एम एच-३१ डब्लु-६८४४) या वाहनाने जोरदार धडक दिली. यात चरणदास ठेंगणे यांचे डोके चेंदामेंदा ते जागीच गतप्राण झाले. मोटरसायकल धडक देऊन पिकअप वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला नालीमध्ये पलटी झाले आहे. पिकअप वाहनाचा चालक पलटी झालेल्या पिकअपचा इंजिन चालू अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच मृतकाच्या कुटुंबियांसह गावकरी घटनास्थळी जमा झाले होते. त्यानंतर घटनेची माहिती वणी पोलिसाना देण्यात आली. जमादार प्रभाकर कांबळे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. घटना पंचनाना करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर म्रुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.