• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नागापूर सबस्टेशन मधील 33 केव्हीचा ट्रांसफार्मर जळाला; ट्रांसफार्मर त्वरित बसवा अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार— प्रदीप मुंडे

ByND NEWS INIDIA

Aug 23, 2022

ND NEWS :परळी वैजनाथ प्रतिनिधी

33 केव्ही ट्रांसफार्मर नागापूर सब स्टेशन मधील जळून खाक झाला आहे. त्यामुळे परिसरातील लाईटवर याचा परिणाम झाला असून ट्रान्सफॉर्मर पाच दिवसात त्वरित बसवावा अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असा इशारा नागापूर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य प्रदीपभैय्या मुंडे (बबलू सेठ)यांनी दिला आहे.

   हा ट्रांसफार्मर जळाल्यामुळे 25 ते 30 गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामध्ये मांडेखेल ,नागापूर ,वानटाकळी, वानटाकळी तांडा, डाबी , दौनापूर ,अस्वलआंबा नागपिंपरी , वाघाळा ,माळहिवरा, गोपाळपूर,बहादुरवाडी आदिसह इतर गावांचा समावेश होतो.

  नागापूर सबस्टेशन मध्ये दोन ते 30 केव्हीचे ट्रांसफार्मर आहेत मात्र एक ट्रांसफार्मर दुरुस्ती विना बंद आहे आणि एका ट्रान्सफॉर्मर वर सर्व लोड आला आहे दोन्हीही ट्रान्सफॉर्मर कार्यरत असतील तर विविध गावातील लोड विभागून दिला तर ट्रांसफार्मर जळणार नाही मात्र त्याकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत आहे. या संदर्भात दोन वेळा शेतकऱ्यांनी जन आंदोलन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली केले आहेत त्यानंतर एक ट्रांसफार्मर बसवण्यात  आला होता.

   कधी कधी आठ तासाच्या लाईट मधून दोन तास लाईट जाते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर परिणामी उत्पन्नावर परिणाम होत आहे. महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची आठ तास लाईट सुद्धा मिळत नाही हे धोरण अत्यंत चुकीचे आहे.

   वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतीच्या पिकावर परिणाम होत आहे. पाणी असून सुद्धा लाईट मुळे पिकांना पाणी देता येत नाही गुरे आणि ढोरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न आहे. अधिकारी वर्गाकडून गेल्या महिन्यात दीड महिना झालं कोणीही ट्रांसफार्मर ची दखल घेतली नाही सर्व अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.

   मी शेतकरी या नात्याने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर गट या नात्याने ट्रांसफार्मर संदर्भात महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली असता आज होईल उद्या होईल अशी उत्तरे त्यांच्याकडून येत आहेत शेतकरी हवालदिल झाला आहे. महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारपूस केली असता त्यांना उडवा उडवी ची उत्तरे अधिकारी देत आहेत.

गेल्या दीड महिन्यापासून पाणी नसल्यामुळे शेतीची आणि शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गत नागापूर परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे गुरांना पिण्यासाठी पाणी नाही कोणीही ट्रांसफार्मर कडे बघायला तयार नाही भरमसाठ बिले भरून सुद्धा लाईट मिळत नाही अशी एकंदरीत अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा अंत महावितरण कंपनीने पाहू नये त्वरित ट्रांसफार्मर दुरुस्त करून कार्यान्वित करावा अशी मागणी त्यांनी महावितरण कडे केली. आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊ देऊ नका पाच दिवसाच्या आत ट्रांसफार्मर बसवण्यात आला नाही तर एक तास अगोदर आपणास नोटीस देऊन नाईलाजाने केव्हाही शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन आंदोलन करतील तसेच आंदोलनात होणाऱ्या नुकसानाची सर्वस्व जबाबदारी महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांची राहील असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदनाद्वारे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, महावितरणचे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तहसीलदार परळी आणि ग्रामीण पोलीस स्टेशन यांना कळवले आहे.