• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नगर-बीड रेल्वे मार्ग लागणार मार्गी..! 150 कोटींचा निधी वितरीत होताच पंकजाताई मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार

ByND NEWS INIDIA

Aug 22, 2022

नगर-बीड रेल्वे मार्ग लागणार मार्गी..! 150 कोटींचा निधी वितरीत होताच पंकजाताई मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार

✍️बीडकरांचे स्वप्न उतरणार सत्यामध्ये
✍️बीडमधून रेल्वे धावावी ही प्रत्येक नागरिकाची इच्छा

ND NEWS : (बीड )दिपक गित्ते

गेल्या अनेक दिवसांपासून  अहमदनगर-बीड ह्या  रेल्वे मार्गाचे काम  सुरु आहे. मध्यंतरी नगरपासून बीड जिल्ह्यातील आष्टीपर्यंत ट्रायलही घेण्यात आली होती. असे असले तरी या रेल्वेमार्गाचे काम हे धिम्या गतीनेच सुरु आहे. मात्र, आता राज्य सरकारने त्यांच्या वाट्याचे 150 कोटी वितरीत केले आहेत. त्यामुळे रखडलेले काम आता अधिक गतीने होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्य सरकारने 150 कोटीचा निधी वितरीत केल्याने माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. एवढेच नाहीतर याबद्दल बीड जिल्ह्याचे अभिनंदनही त्यांनी केले आहे.

बीडमधून रेल्वे धावावी ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून अहमदनगर-बीड या रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे बीडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या असून सरकारच्या धोरणावर या रेल्वे मार्गाचे काम अवलंबून राहिले आहे. मात्र, शिंदे सरकारने आता या मार्गासाठी 150 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे रखडलेले काम मार्गी लागणार आहे.