• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मानकी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

ByND NEWS INIDIA

Aug 24, 2022

मानकी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

यावर्षी एकाच ठिकाणी भरणार सार्वजनिक तान्हा पोळा

ND NEWS वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोंबरे

वणी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा मानकी येथे आगामी बैल पोळा,तान्हा पोळा,बडगा, गणपती या सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी येथिल गाव स्तरिय तंटामुक्त समितीच्या वतीने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे हे होते. तर बैठकीत सरपंच कैलास पिपराडे, उपसरंपच शंकर माहुरे, पोलीस पाटील मिनाक्षी मिलमीले, गावचे प्रतिष्ठित नागरिक प्रमोद वासेकर, तंटामुक्त समितीचे सदस्य उमेश सावरकर, विठ्ठल सरवर, अनिल ठेंगणे,  गुरुदेव चिडे, शंकर वासेकर, उमेश मोहुर्ले, तर सुरक्षा दलाचे अध्यक्ष राहुल ठेंगणे, शुभम नागपुरे, आशिष ठेंगणे, राजु कावडे, महेश पुरी, सौ बेबीताई मालेकर इत्यादी उपस्थित होते.
या बैठकीत आगामी बैल पोळा, तान्हा पोळा, बडगा या सनाच्या पार्श्वभूमीवर गावात भांडण तंटे निर्माण होऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याने गावात जनजागृती करुन शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीत गावात एकच तान्हा पोळा भरविण्याबाबत ठराव पारित करण्यात आला. कारण याआधी गावात दोन ठिकाणी तान्हा पोळा भरविण्यात येत असल्याने शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र यावेळी एकाच ठिकाणी सार्वजनिक तान्हा पोळा भरविण्याबाबत ठराव पारित केल्याने निर्णयाचे समर्थन केले जात आहे.