• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन गारपिटीचे थैमान शेतकरी हवालदिल हातातोंडाशी आलेला घास हिरावला

ND NEWS INDIA

बीड श्रीहरी कांबळे

गेली आठवडा भरात बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्यात काल रात्री व आज दि 9 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान जिल्ह्याच्या काही भागात जबरदस्त अवकाळी पाऊस तर काही भागात गारपीट झाली. यात शेतकर्यांचे खूप नुकसान झाले. उन्हाळी पिके , फळबागा, भाजीपाला पिके आदींचे अतोनात नुकसान झाले.  अचानक झालेल्या अवकाळी पावसाने सिरसाळा व परिसरात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्या सा अवकाळी पावसाने सिरसाळा व परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील आंब्याचे तसेच विट भट्टी चालकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

छायाचित्र 1 मध्ये शेतातील काढणी झालेल्या पिकांच्या गंजी वाहून आलेल्या .

छायाचित्र 2 मध्ये आंबा या फळाबागेचे झालेले नुकसान 

छायाचित्र 3 भाजीपाला या पिकांतर्गत मिरची या पिकाचे झालेले नुकसान 

धारूर तालुक्यात तसेच माजलगाव तालुक्याचा काहिभाग तर परळी अंबाजोगाईचा अल्पसा भाग अवकाळी पावसामुळे व गारपिटीने क्षतीग्रस्त आहे , शासनाने सदर भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत तर दुसरी कडे राख व मातीचे भाव तसेच मजुरांचे प्रश्न यांनी त्रस्त असलेला वीटभट्टी व्यावसायिक या या गारपिटीचा बळी ठरला आहे. लाखो रुपयांचे नुकसान कसे पचावयाचे या विवंचनेत आहे.