• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पोहनेर,परळी रस्त्याचे तीन तेरा… अपघात झाले दहा बारा…

पोहनेर,परळी रस्त्याचे तीन तेरा…
अपघात झाले दहा बारा…

सतत अपघात ,अनेकजण जखमी,

रहदारी करतांना नागरिक जारिस, अपघातात जखमी डाॅक्टर बडेंची मृत्यूशी झुंज

सिरसाळा : अतुल बडे

सिरसाळा ते परळी हा अंत्यत महत्वाच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरु आहे. पंरतु याचे काम करणा-या गुत्तेदारांच्या/ यश कन्स्ट्रक्शन च्या ढिसाळ नियोजना मुळे रस्त्याची पार वाट लागली आहे तर अशीच परिस्थिती सिरसाळा पोहनेर रोडची झाली आहे. अंत्यत चांगल्या अवस्थेत असणारा रस्ता गुत्तेदारांने उखरुन ठेवला आहे. या दोन्ही रस्त्यावरुन रहदारी करताना नागरिक जारिस आले आहेत. गेल्या अनेक महिण्या पासुन दोन्ही रस्ते काम करायचे म्हणून उखरुन ठेवले आहेत. काम अंत्यत धिम्या गतीने व नियोजन बद्ध होत नसल्याने या दोन्ही रस्त्यावर सतत अपघात घडू लागले आहेत. दोन दिवसापुर्वीच सिरसाळ्यातील प्रसिद्ध डाॅक्टर दत्ता बडे हे परळीला सिरियस रुग्ण घेऊन जात असतांना त्यांच्या गाडीचा खराब रस्त्या मुळे अपघात झाला यात ते अंत्यत गंभीर जखमी झाले असून दवाखान्यात मृत्यू शी झूंज देत आहेत.”बातमीपत्र: अतुल बडे”: बंधित गुत्तेदार/कन्स्ट्रक्शन कंपनीने सोयीस्कर रस्ता खोदला नसल्याने व सगळा रस्ता एकदाच उखरुन ठेवला असल्याने अनेक अपघात घडू लागले आहेत. धळीने तर लोक पार वैतागले आहेत. चढ उताराच्या ठिकाणी पाच दहा फूट रस्ता खोदून ठेवला आहे . या ठिकाणी तर खुप मोठा अपघात धोका निर्माण झाला आहे. पोहनेर रोडवर तर नुकतेच चार दिवसांपूर्वी एक व्यक्ती दुचाकीवरून कोसळला यात तो गंभीर जखमी झाला आहे. गुत्तेदारांच्या ढिसाळ नियोजना मुळे पोहनेर, परळी ह्या दोन्ही रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या कडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या रस्त्यांची कामे पुर्ण करुन घ्यावीत अशी मागणी होऊ लागली आहे.

● राष्ट्रवादीचे नेते एमटी देशमुखांच्या गाडीला अपघात : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एमटी नाना देशमुख यांचा काल सकाळी १० वाजताच्या दरम्यान परळी कडून मधल्या मार्गाने पोहनेर कडे जात असतांना नाथ्रा फाट्याच्या नजीक अपघात झाला,चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची चार चाकी गाडी दोन पलट्या घेत रस्ता खाली कोसळली
यात सुदैवाने त्यांना कसलीही इजा झाली नाही.चालकाला देखील इजा झाली नाही.अपघाताचा प्रकार कळताच माजी आमदार आर टी देशमुख यांनी एमटी देशमुख यांची भेट घेत तब्बेतेची विचारपुश केली.सदरील अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे झाला असला तरी याला पोहनेर चा खराब करुन ठेवलेला रस्ता जबाबदार आहे. तो मार्ग खराब आहे/गुत्तेदाराने खराब करुन ठेवला आहे म्हणून मधल्या मार्गाने श्री देशमुख पोहनेर कडे जात होते.