• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन 8 एप्रिल 2024 पर्यंत अदा करा :राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन 8 एप्रिल 2024 पर्यंत अदा करा :राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

परळी : अमोल सुर्यवंशी

महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पवित्र रमजान ईद निमित्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन 8 एप्रिल 2024 पर्यंत अदा करणे बाबत,राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा परळीच्या वतीने निवेदन देण्यात आले

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा परळी वैजनाथ च्या वतीने चालू एप्रिल महिन्यात राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती तसेच रमजान ईद गुढीपाडवा रामनवमी व हनुमान जयंती असे सण असल्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना हे सण उत्सव साजरे करण्याकरिता सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन दिनांक 8 एप्रिल 2024 पर्यंत अदा करण्यात यावेत जेणेकरून सर्व कर्मचाऱ्यांना सर्व उत्सव आनंदमय वातावरणात व उत्साहामध्ये साजरे करता येतील तसेच महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम अदा करण्यात यावी. नगरपरिषद कर्मचारी यांनी उचललेले विविध बँकेचे मासिक हप्ता या महिन्यात सण उत्सवामुळे कपात न करता पूर्ण वेतन देण्यात यावी या व अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा परळी वैजनाथच्या वतीने परळी शाखेचे प्रमुख प्रशांत जगतकर,तुकाराम उपाडे सुनील गायकवाड व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदरील निवेदन नगरपालिका प्रशासनास देण्यात आले आहे.