• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लोकसभेच्या रणांगणात ‘समाज गुत्तेदारांची’ कसोटी लागणार !

लोकसभेच्या रणांगणात
‘समाज गुत्तेदारांची’ कसोटी लागणार !

लोकसभेच्या रणांगणात
‘समाज गुत्तेदारांची’ कसोटी लागणार !

मराठा, दलित,मुस्लिम मतांची जुळवाजुळव करण्याचे जात पुढा-यां पुढे आव्हान

सिरसाळा व सर्कल ची परिस्थिती

सिरसाळा : अतुल बडे

परळी मतदार संघात महायुतीची ताकत मोठी जरी असली तरी मतदारसंघातील मराठा,दलित,मुस्लिम मतांची जुळवाजुळव केल्याशिवाय महायुतीला पर्याय नाही. सद्या परिस्थितीत ह्या तीन समूहांचा मूड डायव्हर्ट असल्याचे दिसत आहे. या मतांच्या बेरीजेसाठी समाजाची ‘राजकीय गुत्तेदारी’ करणाऱ्यां ‘जात पुढाऱ्यांची’ यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात कसोटी लागणार आहे. हि परिस्थिती जिल्ह्यात सर्वत्र असणार आहे परंतु याचे पडघम परळी मतदार संघात अधिक दिसुन येण्याची शक्यता आहे . कारण आगामी सहा महिण्यावरील विधान सभेची बरीचशी गणिते लोकसभेच्या रणसंग्रामत अवलंबून असणार आहेत. मराठा,दलित, मुस्लिम वोटींग मिळवण्यासाठी समाजाची राजकिय गुत्तेदारी करणाऱ्यां जात पुढाऱ्यांवर महायुतीच्या कारभा-यांची मदार असणार आहे.जरांगे पाटलांच्या परळीतील बैठक परवाण्यासाठी समाजाला कराव लागलेला संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेला राजकीय रोष दुसरी कडे आरक्षण लढ्यात न्याय झाला नसल्याची भावना पसरल्याने महायुती सरकारवर समाजाची नारजगी असल्याची परिस्थिती आणि विशेषत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीच्या सभेत केलेले आवाहन व इतर काही कारणे बघता परळी मतदारसंघातील गोदाकाठ ते बालाघाट मधला मराठा समाज वेगळ्या मूड मध्ये असल्याने समाजाची मते महायुतीच्या पारड्यात वळवण्यासाठी समाज गुत्तेदारांची कसोटी लागणार आहे. गेल्या विधानसभा/लोकसभा निवडणुकीत दलित समाजाची एकगठ्ठा मते वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात गेली होती. प्रत्येक खेड्या गावातून वंचित आघाडीला मोठ्या संख्येने मतदान झाले होते . विशेष म्हणजे सिरसाळ्या सारख्या गावातून लोकसभेला १ हजार पार तर ग्रामपंचायत निवडणुकीत १ हजार २०० पार चा आकडा वंचित ने सर केला होता. हि बाब त्या वेळी राष्ट्रवादीला चिंता करायला लावणारी असली तरी आता महायुतीला देखील चिंताजनक आहे. या वेळी देखील जवळपास ८०० ते ९०० मते वंचित उमेदवारास अथवा वंचित पुरस्कृत पारड्यात जातील अशी आज घडीला परिस्थिती आहे. या ठिकाणी दलित समाजाची मते महायुतीच्या पारड्यात वळवण्यासाठी ‘समाज गुत्तेदारांची’ कसोटी लागलेली पहावयास मिळणार आहे. मुस्लिम समाजत तर अधिक वेगळी परिस्थिती आहे. या ठिकाणी निवडणुकानुसार मुस्लिम सामजाची राजकीय परिस्थिती आकार घेते. विशेषत लोकसभा सारख्या निवडणुकीत सिरसाळ्यातील मुस्लिम समाजाची वेगळी भूमीका राहाल्याची पार्श्वभूमी आहे. राष्ट्रवादी विचारसरणीचा मुस्लिम मतदार महायुतीचा कितपत स्विकार करेल ? असा प्रश्न आहे.एक धरला तर दुसरा पळतय,दुसरा धरला तर पहिला निसटतय अशी नाकी नऊ आणणारी परिस्थिती होणार आहे. यात समाजाच्या राजकीय गुत्तेदारांची टोकाची कसोटी इथे देखील पहावयास मिळणार आहे.