• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अंबाजोगाई तालुका उपप्रमुखपदी निखिल पाडुळे तर उपशहर प्रमुखपदी पप्पू आपेट यांची निवड

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अंबाजोगाई तालुका उपप्रमुखपदी निखिल पाडुळे तर उपशहर प्रमुखपदी पप्पू आपेट यांची निवड

अंबाजोगाई : प्रतिनिधी

शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे लाडके मा. मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे. युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मराठवाडा नेते आमदार सुनीलजी प्रभू ,शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे. मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूरकर साहेब. बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार साहेब. बीड लोकसभा प्रमुख सुनील धांडे सर. सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे साहेब. केज विधानसभा संपर्क प्रमुख परशुराम जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या हस्ते अंबाजोगाई तालुका प्रमुख बालासाहेब शेप प्रिन्स यांच्या सूचनेवरून निखिल पाडुळे यांची अंबाजोगाई उपतालुका प्रमुख व पप्पू आपेट यांची उपशहर प्रमुख म्हणून निवड करून सत्कार करण्यात आला. यावेळी अंबाजोगाई तालुका प्रमुख बालासाहेब शेप (प्रिन्स), केज तालुका प्रमुख अशोक जाधव, अंबाजोगाई शहर प्रमुख अशोक हेडे. केज शहर प्रमुख तात्या रोडे, अमर वाघमारे, पिंटू चौरे ज्ञानेश्वर बोबडे, ऋषिकेश कुटे, ज्ञानेश्वर शेळके, विश्वनाथ बापू राऊत, आदीउपस्थित होते.