• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सावता महाराज समाधी सोहळ्यास दि.10 जुलै पासुन प्रारंभ

सावता महाराज समाधी सोहळ्यास दि.10 जुलै पासुन प्रारंभ
परळी (प्रतिनिधी)
संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळीतील संत सावतामाळी मंदिरात दि.10 ते 17 जुलै या कालावधीत समाधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमीत्त नामवंत किर्तनकारांची किर्तने,रक्तदान शिबीर,गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.10 जुलै पासुन सुरु होत असलेल्या या सप्तासात पहाटे 4 ते 6 यावेळेत काकडा,सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वर पारायण,सकाळी 11 ते 1 गाथा भजन,दुपारी 2 ते 4 सावता महाराज चरित्र,सायंकाळी 6 ते 7 धुपारती,रात्री 9 ते 11 हरिकीर्तन होणार असुन यामध्ये ह.भ.प. क्षीरसागर महाराज उखळीकर,ह.भ.प.कृष्णाकांत महाराज सताळकर,ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर,ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर,ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे,ह.भ.प.अर्जुन महाराज लाड,ह.भ.प.गोवर्धन महाराज यांचे तर दि.17 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प.विठ्ठल महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.शनिवार दि.15 रोजी नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांचे किर्तन होणार आहे.दि.16 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सावता महाराज पालखी सोहळा होणार आहे.या सप्ताहात परळी,मांडवा,मरळवाडी,मिरवट,निळा,सारडगाव,नंदनज,कासारवाडी,लोकरवाडी,धामोनी,सेलु,लोणी,बोंदरगाव,इंजेगाव,पांगरी,बेलंबा,टोकवाडी,डाबी,कन्हेरवाडी,मलकापुर,जिरेवाडी,शेंडगा,संगम,नाथ्रा या गावांची भजनी सेवा होणार आहे.
@@@@@@
रक्तदान शिबीर व गुणवंतांचा सत्कार
या सोहळ्यात शनिवार दि 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीर व रात्री 10 वाजता समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संत सावतामाळी समाज परळीच्या वतिने करण्यात आले आहे.