• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांना राज्यमंत्रिमंडळात स्थानही देण्यात आलं आहे. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, अद्याप खाते दिलं नाही. अजितदादांना अर्थमंत्रीपद किंवा महसूल मंत्रीपद दिलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अजितदादांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला आहे. तर महसूलमंत्रीपद देऊन भाजपला राधाकृष्ण विखेपाटील यांची नाराजी ओढवून घ्यायची नाहीये. त्यामुळे भाजप कात्रीत सापडला आहे. मात्र, असं असूनही भाजपने ममोठा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे.